गननभैय्या अनिल हाडा यांची अहिल्यानगरकोपरगाव शहर शिवसेना युवासेना युवासेनेच्या शहर युवा अधिकारी पदी नेमणूक…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख मा.श्री. आदित्यजी ठाकरे साहेब व शिवसेना तथा युवासेना सचिव मा.श्री. वरूणजी सरदेसाई यांच्या सुचनेनुसार, आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराजजी कावडीया व शिर्डी लोकसभा युवासेना विस्तारक राहुलजी ताजणपुरे यांच्या नियुक्ती पत्राने पैलवान गननभैय्या अनिल हाडा यांची अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेतील
कोपरगाव शहर शिवसेना युवासेना युवासेनेच्या शहर युवा अधिकारी या पदी नेमणूक करण्यात आली आहे.
युवासेना शहर युवा अधिकारी पैलवान गननभैय्या अनिल हाडा यांच्या समाजाप्रती असलेली कार्यपद्धती आणि पक्षावर असलेल्या निष्ठेची दखल शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी दखल घेऊन जबाबदारी दिली आहे,. यासंदर्भात पैलवान गननभैय्या हाडा यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी हि विश्वासाने पार पाडणार आणि युवाकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी जीवाचे रान करून पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी हात बळकट करण्यासाठी रक्ताचे पाणी करणार,. संघर्ष हा निष्ठावंत शिवसैनिक युवा सैनिकांच्या पाचवीला पुजलेला असतो आणि हिच उर्जा समजून जनहितार्थ शिवसेना युवासेना वाढीसाठी निष्ठेने काम करत राहणार,..शाळा महाविद्यालये आणि तसेच शिक्षीत कष्टाळू बेरोजगारांचे अनेक नानाविध प्रश्न शासन प्रशासन दरबारी शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती विचारांनी चौफेर मांडणार आणि न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार आहे असे शपथ घेवून सांगितले,..
शहरातील अनेक तरुण शिवसैनिक आणि युवा सैनिकांच्या मनासारखी गननभैय्या हाडा यांची नियुक्ती झाल्याने शहर शिवसेना युवासेनेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे,.. यंदाच्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा ध्वज सर्व शिवसेना युवासेना आजी माजी नगरसेवक, नगरसेविका,पदाधिकारी आणि शिवसैनिक युवा सैनिकांना विश्वासात घेऊन नगरपालिकेवर फडकवणारच असे मत हितचिंतकांनी व्यक्त केले,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *