के. जे. सोमैया महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक साजरे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय, कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना विभाग व तहसिल कार्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण’ सत्र आयोजित करण्यात आले. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमध्ये संयम बाळगून शांततेने तात्काळ निर्णय घेउन वित्त व जिवीतहानी टाळता यावी यासाठी एन.डी.आर.एफ. दलाच्या वतीने महाविद्यालयात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण सत्रासाठी एन.डी.आर.एफ. चे इन्स्पेक्टर मा. योगेशकुमार शर्मा, मा. संतोषकुमार तिवारी हे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर तहसिल कार्यालय, कोपरगाव येथील निवासी नायब तहसिलदार सौ. प्रफुल्लिता सातपुते, मा. उदावंत, कोपरगाव नगरपालिका विभागाचे अग्निशमन अधिकारी मा. भागवत घायतडक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे हे मान्यवर उपस्थित होते. मा. योगेशकुमार शर्मा यांनी विविध आपत्तींची माहिती देतानांच संकटकाळी करावयाची उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन केले. आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन जीवनरक्षक कवायती आत्मसात केल्या पाहिजे असे सांगितले. यावेळी त्यांनी विविध आपत्तीतून बाहेर येण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांचे प्रात्यक्षिके करून दाखविली व उपस्थित विद्यार्थ्यांकडून अनेक प्रात्यक्षिके करूनही घेतली. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड यांनी महाविद्यालय स्तरावर अशा प्रात्यक्षिकातुन विद्यार्थ्यांमध्ये जन-जागृती होणार असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एन. जी. शिंदे यांनी केले. या प्रशिक्षण सत्रासाठी डॉ. अभिजीत नाईकवाडे, श्री. संजय पाचोरे, श्री. सुशांत घोडके, कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *