शोभा जयपूरकर यांची परिषदेच्या राज्य महिला संघटकपदी नियुक्ती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(मुंबई):-
मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य महिला संघटक म्हणून नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि परिषदेच्या झुंजार कार्यकर्त्या शोभा जयपूरकर यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज केली आहे.. पुढील दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल.. राज्यातील महिला पत्रकारांना एकत्र करून परिषदेच्या नेतृत्वाखाली त्यांचे भक्कम संघटन उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे..
रत्नागिरी येथील पत्रकार जान्हवी पाटील यांनी यापुर्वी दोन वर्षे समर्थपणे राज्य महिला संघटक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.. त्यांच्याकडे अन्य जबाबदारी सोपविण्यात येत असल्याने रिक्त झालेल्या पदावर जयपूरकर यांची नियुक्ती केली जात आहे..जयपूरकर या गेली ३० वर्षे पत्रकारितेत असून परिषदेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग राहिलेला आहे.. पहिल्यापासून त्या परिषदेशी जोडल्या गेलेल्या आहेत..
अन्य पदांच्या नियुक्तया लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती अध्यक्ष शरद पाबळे यांनी दिली आहे..
एस.एम देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी शोभा जयपूरकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *