हत्ती गणपती कोपरगाव आणि कालांश राजगिरा लाडू यांच्या वतिने भव्य निंबध स्पर्धेचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :-हत्ती गणपती कोपरगाव आणि कालांश राजगिरा लाडू आयोजित माननीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य महाराष्ट्र राज्य निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.सदरची निंबध   स्पर्धा तारीख 23 जानेवारी पासून ते 5 फेब्रुवारी पर्यंत आहे. निबंधाचा विषय एक दिवस… मोबाईल शिवाय असुन स्पर्धेसाठी निंबध पाठवावे असे आवाहन आयोकांनी केले आहे.
स्पर्धा वयोगट वय 6 ते 18 आणि खुला गट अशी राहिल.निबंधाची भाषा माध्यम मराठी असावे आणि सुंदर अक्षर व शुद्धलेखन नीटनेटकेपणा असावा. एका घरातून कितीही व्यक्ती सहभागी होऊ शकता पण निबंध त्याने स्वतः लिहिलेला असावा, निबंध जपून ठेवावे, वेळप्रसंगी ते जमा करावे लागेल. निबंध इंटरनेट वरील कॉपी नसावा, आम्हाला आढळल्यास स्पर्धक त्वरित बाद होईल.निबंधाच्या उजव्या बाजूला स्पर्धकाचे नाव, जन्म तारीख, पत्ता, शाळा अथवा व्यवसाय, मोबाईल नं. इत्यादी माहिती स्पष्ट भरणे अनिवार्य.आहे सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल.
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील स्पर्धकांनी बस स्टॅन्ड समोर प्रगती मेडिकल आणि ऑप्टिकल मध्ये दिलेल्या वेळेत जमा करावेत.तसेच कोपरगाव तालुक्याबाहेरील स्पर्धकांनी 9552225528 आणि 9669939555 या WP नं वर आपले निबंध PDF फाईल द्वारे पाठवावे. स्पर्धा हि सर्वासाठी विनामुल्य असेल.या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभागी व्हावे असे आवाहन हत्ती गणपती कोपरगाव मंडळाचे भरत मोरे,कालांश उद्योग समूहाचे रोहित काले जय महाकाल मित्र मंडळ  गगन हाडा,नवश्या गणपती मंडळाचे बालाजी गोर्डे भगवे राजे मित्र मंडळ  अमोल शेलार यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *