स. न. २०२७ या वर्षात होणा-या ‘सिंहस्थ कुंभमेळयाच्या विकास आराखडयात कोपरगांव” चा समावेश करावा:- मा.नगराध्यक्ष राजेंद्र झावरे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय संस्कृतीत कुंभमेळा हा महत्वाचा आध्यत्मिक सोहळा आहे.दर १२ वर्षांनी हा सोहळा होत असतो.देशातील मोजक्याच ठिकाणी कुंभमेळा होत असतो,स.न.२०२७ ला हा कुंभमेळा नाशिक ला होत आहे.त्यामुळे या कुंभमेळेच्या विकास आखाड्यात कोपरगावचा समावेष करावा अशी मागणी मा.नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी केली आहे.
कोपरगाव तालुक्याला व शहराला दक्षीण काशी व दक्षीण वाहिनी पवित्र गंगा गोदावरी नदी मुळे तसेच दैत्यगुरु शुक्राचार्य कचेश्वर (कचेश्वर देवयानी) संजीवनी विद्या कचेश्वर मंदीर ,साई तपोभूमी, निभांडक ऋषी ,शुगेश्वर ऋषी विष्णु मंदीर नारदानी नारदी झाली ते ठिकाण राघोबादादा पेशवे वाडा जनार्दन स्वामी व जंगली महाराज आश्रम संत रामदासी महाराज इत्यादी मुळे पौराणीक धार्मीक, ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. त्यांच्या कथा व अख्यायीका सर्वश्रृत आहे. व  त्यांचे साक्षी व पुरावे आजही येथे पहावयास मिळतात. या सर्व नोंदी शासन दप्तरी आहेत दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक पवित्र गंगा गोदावरी स्नाना साठी व शुकाचार्य कचेश्वर मंदीरात दर्शनासाठी येतात तसेच दर १२ वर्षानी येणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिक येथे येणारे सर्वच भाविक हे कोपरगांव येथे आवर्जुन येत असतात.या धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक शहराच्या मधोमध पवित्र गंगा गोदावरी नदी वाहत आहे भाविकांसाठी व तिर्थ क्षेत्राच्या विकारासाठी गोदावरी नदीच्या दोन्ही बाजुला अंदाजे ३० कि.मी. घाट बांधणे आवश्यक आहे. तसेच शहराच्या आजू बाजूच्या गावांचे सांडपाणी यामुळे नदी पात्र व पाणी प्रदुषीत होते ते सांडपाणी शुध्द करून पुन्हा नदी पात्रा मध्ये सोडणे आवश्यक आहे. तसेच वरील प्रमाणे पौराणिक व ऐतिहासिक महत्व असलेल्या मंदिराचा परिसर सुशोभिकरण करणे व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्या साठी मोठ्या प्रमाणात निधी ची आवश्यकता आहे. , सन २०२७ मध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळयाच्या विकास आराखडयात कोपरगांव चा समावेश करावा अशी मागणी मा.नगराध्यक्ष. यांनी २४ जानेवारी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांच्या कडे केली आहे.सदरचे निवेदन तहसीलदार महेश सावंत,आणि मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *