के.जे.सोमैया महाविद्यालयात मोफत कृत्रिम अवयव वाटप व फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग मुंबई, साधू वासवानी मिशन पुणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव, दिव्यांग सेना मनसे व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २५ रोजी मोफत कृत्रिम अवयव वाटप व फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. आशुतोषदादा काळे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, मा.ॲड. संजीव कुलकर्णी, मा.डॉ.पोथीराज पिचायी, मा.मिलिंद जाधव, मा.सुशिल ढगे, डॉ.रिद्धी गोराडिया व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या शिबिरासाठी अहमदनगर जिल्हासह नाशिक, धुळे, संभाजीनगर, नंदुरबार इत्यादी जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मा. आशुतोषदादा काळे यांनी सांगितले कि दिव्यांगांसाठी आयोजित या शिबिराचा लाभ अधिकाधिक दिव्यांगांनी घ्यावा व त्यांनीही स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करावा. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिव्यांगांना शासकीय लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ.पोथीराज पिचायी, मा. मिलिंद जाधव, मा. सुशिल ढगे यांचे फिजिओथेरपी या विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे यांनी या शिबिराचे आयोजन करणाऱ्या सर्वच सामाजिक संस्थांचे कौतुक करतानांच अशा शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांना निश्चितच आधार मिळणार असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी आमदार आशुतोषदादा काळे यांच्या समाजकार्याचा उंचावत असलेल्या आलेखाबद्दल गौवोद्गार ही काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आपल्या स्वागत मनोगतात महाविद्यालय विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अनेक सामाजिक संस्थांसोबत कार्य करीत आहे. यापुढेही आम्ही सामाजिक कार्याला हातभार लावण्यासाठी सतत अग्रेसर राहू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. योगेश गंगवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या शिबिराच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी तर आभार शिबिराचे कार्यवाहक डॉ. संजय दवंगे यांनी मानले. या शिबिरासाठी मा.जवाहरभाई शहा, मा. सुनील बोरा, मा. प्रशांत ठोंबरे, संस्थेचे विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मा. संतोष गंगवाल, नगरसेवक मा. मंदार पहाडे, मा. ॲड.सुनील शिलेदार, मा.राजेंद्र वाकचौरे, रजिस्ट्रार डॉ.अभिजित नाईकवाडे व इतर मान्यवर उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *