कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव दिनांक 21 ते 25 जानेवारी रोजी अवकाशात मंगळ,गुरु, नेपच्युन,शुक्र, शनी ग्रहांची स्थिती अत्यंत सरळ रेषेमध्ये आहे. ही अत्यंत दुर्मिळ अशी खगोलीय घटना होती .या घटनेचा कोपरगाव आणि परिसरातील खगोलप्रेमी नागरिकांना फायदा घेता यावा या साठी महाविद्यालयाच्या अस्ट्रो क्लबने 25 जानेवारी रोजी अवकाश निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी कोपरगाव परिसरातील नागरिकांनी तसेच पंचक्रोशीतील शिक्षक आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसह उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनी व विद्यार्थी,राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट उपस्थित होते.या प्रसंगी अस्ट्रो क्लब चें समन्वयक भूगोल विभागाचे डॉ.वसुदेव साळुंके यांनी उपस्थितांना मंगळ,गुरु,शनी शुक्र हे ग्रह टेलिस्कोप मधून दाखवले. तसेच या खगोलीय घटनेचे महत्व समजावून सांगितले.तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या खगोलीय घटनांचे निरीक्षण करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील व पंचक्रोशीतील अभ्यासू व खगोल प्रेमीनीं महाविद्यालयातील निरीक्षण केंद्राचा फायदा घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केले.को.ता.ए सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे,सौ. शोभाताई रोहमारे, विश्वस्त संदीप रोहमारे, सुधीर डागा यांनी या कार्यक्रमाचे उदघाटन केले. याप्रसंगी मा.संग्राम देशमुख,समाजसेवक आदिनाथ ढाकणे,निलेश जपे इतर अनेक खगोलप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते .या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या अवकाश निरीक्षण केंद्रावर 200 पेक्षा जास्त नागरिकांनी या दुर्मिळ घटनेचा आनंद घेतला.

फोटो ओळ- अवकाश निरीक्षण केंद्राचे समन्वयक डॉ.वसुदेव साळुंके विद्यार्थ्यांना ग्रहांची माहिती देताना
