रुसवे – फुगवे, मान – अपमान या गोष्टी विसरून व माणूस म्हणून एकमेकाला सहकार्य करणे गरजेचे आहे:- अनिरुद्ध काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
सध्या देशासह कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आपल्या परिसरातील तसेच नातेसंबंधातील अनेक जण कोरोनाने बाधित झाल्याचे तसेच मृत्यु झाल्याचे आपण बघत / ऐकत आहोत. तसेच अनेक जणांना वैद्यकीय सुविधा अपूर्ण पडत असल्याचाही घटना समोर येत आहेत.
ह्या कठीण प्रसंगात आपण सर्वांनी सर्व रुसवे – फुगवे, मान – अपमान या गोष्टी विसरून व माणूस म्हणून एकमेकाला सर्व सहकार्य करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच आपल्या प्रभाग क्रमांक २ सुभद्रानगर , निवारा, आढाव वस्ती, येवला रोड , कोजागिरी कॅालनी ,परिसरातील कोणालाही कोरोना चाचणी, बेडची उपलब्धता, लसीकरण किंवा इतर कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास मला कधीही फोन करा माझ्याकडून होईल ती सर्व मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे.
आपण सगळे मिळून ह्या कोरोनाच्या संकटातून लवकरच बाहेर पडू असा मला विश्वास आहे. तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. नियमांचे पालन करा व सुरक्षित रहा !

  • आपलाच
    …अनिरुद्ध काळे…
    9850800523

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *