प्रत्येकाचा जीव खुप अनमोल आहे, जीवन एकदाच मिळते, भरभरून जगा:- सौ.वंदना जगमोहन चिकटे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, आणि त्या नंतर येणारी एप्रिल ची सुरुवात ……
आमच्या कुटुंबासाठी नभामध्ये काळेकुट्ट ढग जमले होते …. त्यातुन घोंघावणारा वादळी वारा आमच्या दारावर आदळत होता …. आणि त्याची शिकार आमच्या घरातील एकेक जण होत होते …..
प्रथम माझ्या मिस्टरांना जबरदस्त पाठ दुखीचा त्रास सुरू झाला …. आमच्या फॅमिली डॉ . ना विचारले असता त्यांनी कोविड टेस्ट करुन घ्या असा सल्ला देण्यात आला …आता हि लक्षणे सगळ्यांना नवीनच होती …. टेस्ट पॉझिटिव्ह आली ….. तिथेच पहिला बॉम्ब फुटला ….
सगळ्यांनी मिळुन आम्हीं त्यांना धीर दिला …त्यांना सकारात्मक राहिला सांगितले …. सुन, मुलगा …. लेक जावई …. पुतणे ….. दिर जाऊ …. त्यांच्या पाठीशी उभे राहिले ….

त्यानंतर ह्यांना होम qurantine केले ..... आमचे दुकान पुर्ण बंद ठेवले .... त्या नंतर ह्यांच्या सेवेत रुजु असतांना 4 दिवसांनी मला सर्दीचा त्रास, डोकेदुखीचा त्रास सुरू झाला ... दुसऱ्या फ्लॅट मध्ये राहणारे दिर , जाऊ ह्यांना पण त्रास सुरू झाला .... आम्हीं तिघेही positive निघालो ...कोणीच कोणाच्या संपर्कात नसतांना असे घडले …...आमच्या कुटुंबाला  हा खुप मोठा धक्का होता ....आम्हीं सगळ्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हात, पाय मारण्यास सुरुवात केली .... 

आम्हीं तिघेही दवाखान्यात admit झालो …. पावलागणिक संसाराच्या, मुलांच्या, आर्थिक परिस्थितीचा चिंता वाटायला लागल्या …. एकदा आपण त्यात अडकलो की सगळ्या टेस्ट सुरु होतात ,…. बिलाचा आकडा दिवसंदिवस फुगत जातो ….
परंतु आम्हीं सकारात्मक भुमिका, आणि खंबीर मनोबल, आपल्याला लवकर बरे व्हायचे हा दृढनिश्चय करुन लढत होतो ….
माझा पुतण्या घरच्या, दवाखान्याच्या जे काका काकु safe आहेत त्यांच्या
सगळ्या लढाया एकटा लढत होता
त्याची खुप दमछाक होत होती …. पण ह्या आजारात मनात असुनही कोणी कोणाला मदत करू शकत नाही ….. शेवटी आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती कामाला येतात ….
माझ्या बहिण आणि मेहुणे ह्यांनी आमची डब्याची व्यवस्था चोख ठेवली त्या मुळे आम्हांला खुप मदत झाली …

आम्हीं सगळ्या संकटावर मात करुन आता सुखरूप आहोत ….. पण असा प्रसंग कोणत्याच कुटुंबावर यायला नको …..

त्या त्या वेळेस त्या त्या प्रसंगांतून जातांना आपल्या व आपल्या कुटुंबावर मानसिक खुप ताण येतो …

त्या कुटुंबाला आपला समाज वाळीत टाकल्या सारखी वागणुक देतो ….ती भावना सगळ्यांनी बदलुन टाका …
पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मागे खंबीर उभे राहा …. शक्य झाल्यास आर्थिक मदत ऑनलाईन करु शकता ….
शहरात असा कि तालुक्यात प्रत्येक टेस्ट साठी लागणारा खर्च आपल्या सारख्या मध्यम वर्गीयांना तसेच गरिबांना परवडत नाही …. सरकारने काही नियम घालुन दिले आहे …. त्या पेक्षा जास्त घेतले तर तुम्हीं आवाज उठुवू शकता ….

कोरोनाचा तुम्हीं सामान्य समजू नका ….बेड मिळत नाहीए, लग्नाच्या पंगतीत जसे जेवणाऱ्याच्या मागे उभे राहतो .. तसे झाले आहे हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी ….

Injection आणि गोळ्या तसेच ऑक्सिजन सिलेंडर तुटवडा पडत आहे …. कधी कधी त्याचा काळाबाजार सुद्धा होत आहे …
प्रत्येकाचा जीव खुप अनमोल आहे … जीवन एकदाच मिळते …. भरभरून जगा … खळखळून हसा …. डोळे भरून निसर्ग पहा ….

सांगायचे तात्पर्य इतकेच की घराबाहेर विनाकारण जाऊ नका …
सगळे नियम पाळा

आणि हो आमच्या कुटुंबावर सगळ्यांनी फोन द्वारे, msg द्वारे जो शुभेच्छांचा वर्षाव केला ….
आणि आमची चौकशी केली
त्या बद्दल सगळ्यांचे मनःपुर्वक आभार
असाच लोभ आमच्यावर असु द्या !!!!!
सगळ्यांनी एकमेकाला मदत करा !!!!!

आपण लवकरच ह्या वैश्विक संकटातून बाहेर येऊ !!!
आणि सगळ्यांना आरोग्य संपन्न आयुष्य लाभो !!!!

हिच श्री साई चरणी नम्र प्रार्थना !!
ओम साई राम
सौ.वंदना जगमोहन चिकटे.
…कोपरगाव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *