सेवानिवृत्त नायब तहसीलदार खिवराज दुशिंग यांचा वाढदिवस भंन्तेजीच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा…

Uncategorized

सेवानिवृत्त नायब तहसीलदार खिवराज दुशिंग यांचा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सत्कार करुन केला वाढदिवस साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथे दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १२.३० वाजता आयु खिवराज दुशिंग सेवानिवृत्त नायब तहसीलदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे नातेवाईक मित्र मंडळ समाज बांधव यांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या निमित्ताने भदंत अमृतनंदबोधी, भदंत आनंदजी सुमन श्री, भदंत कश्यप जी यांची धम्मदेशना कार्यक्रम संपन्न झाला

.तसेच सकल आंबेडकर समाजाने देखील त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी सकल आंबेडकरी समाजाचे अध्यक्ष प्रकाशजी दुशिंग ,कार्यअध्यक्ष शरद खरात, संजय कांबळे मा. नगर सेवक, नितीन बनसोडे, अनिल बनसोडे मनोज शिंदे राजेंद्र पगारे संदीप  पगारे मा .नगर सेवक, दिनेश कांबळे मा. नगर सेवक,वर्षा शिंगाडे मा.नगरसेविका संतोष कोपरे ,राजु पगारे, प्रफुल्ल शिंगाडे,  देवराम पगारे, आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते . सकल आंबेडकरी समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आयु खिवराज दुशिग साहेबांना शुभेच्छा देऊन सत्कार केला कार्यक्रमाची प्रस्तावना  बौद्धाचार्य प्रल्हाद जमधडे यांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *