जिल्हा परीषद मार्फत आरोग्य केंद्र, उपकेंद्राद्वारे ऑक्सिजन बेड व व्हेंटीलेटर उपलब्ध करून द्यावे:-श्री.सुमित कोल्हे. मंत्री मा.श्री. आदित्य ठाकरे यांचेकडे मागणी…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनीधी:-
कोपरगांव शहरासह कोपरगांव तालुक्यातील ग्रामीण भागाची कोरोना महामारीमुळे अत्यंत दयनिय अवस्था झाली असुन दिवसेंदिवस रूग्नांची संख्या वाढत आहे. उपचारासाठी शहरी भागातील दवाखान्यांमध्ये पुरेसे बेड, आक्सिजन व व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने रूग्नांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. यावर उपाय म्हणुन जिल्हा परीषद अंतर्गत तालुक्यात असणारे सहा आरोग्य केंद्र, एक नागरी आरोग्य केंद्र व बत्तीस आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी ऑक्सिजन बेडची सुविधा व शक्य असतील तितके जास्त व्हेटीलेटर्स उपलब्ध करून दिले तर रूग्नांची व त्यांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ आणि गैरसोय, एकाच ठिकाणी होणारी गर्दी व उपचारात होणारा विलंब टाळता येईल, अशी मागणी संजीवनी फाऊंडेशनचे सचिव व युवा कार्यकर्ते श्री सुमित कोल्हे यांनी राज्याचे मंत्री मा. श्री. आदित्य ठाकरे यांचेकडे ई मेलद्वारे केली आहे.
श्री कोल्हे यांनी ई मेल मध्ये म्हटले आहे की सरासरी ५००० नागरीकांमागे एक उपकेंद्र असल्याने येथिल स्टाफ व व्यवस्था वापरून रूग्न तपासणी, तातडीचे उपचार व विलगीकरन शक्य होईल. तसेच ऑक्सिजन बेड , व्हेंटीलेटर्स आदी सेवा उपलब्ध झाल्यास होणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण होवुन नागरीकांची धावपळ कमी हाईल. अत्यावश्यक व गंभीर रूग्नांनाच तालुका आरोग्य केंद्र अथवा कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी येण्याची गरज भासेल. श्री कोल्हे यांनी ई मेल मध्ये असेही म्हटले आहे की कालच एका रूग्नाच्या नातेवाईकाने इतरत्र आक्सिजन बेड मिळत नसल्याने संजीवनी फाऊंडेशनची कार्डियाक अँब्युलन्सची मागणी करून आमच्या रूग्नाला अँब्युलन्स मधिल आक्सिजन मिळावा यासाठी विनंती केली. परीस्थिती किती हाताबाहेर गेली आहे ही बाब श्री कोल्हे यांनी निदर्शनास आणुन दिली आहे.
सदरप्रश्नात मा. मंत्रीमहोदयांनी वैयक्तिक लक्ष देवुन संबंधित मंत्रालय व विभागास तातडीने कार्यवाही करणे करीता श्री कोल्हे यांनी कळकळीची विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *