औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करणारा ऑक्सिजन प्लॅन्ट बंद असून तो वैद्यकीय वापरासाठी सुरु करण्यात येणार आहे:- विवेक भैय्या कोल्हे….

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
“संगमनेर तालुक्यातील लोहारे – मिरपूर येथील औद्योगिक वापरासाठी
ऑक्सिजन पुरवठा करणारा ऑक्सिजन प्लॅन्ट बंद असून तो वैद्यकीय वापरासाठी सुरू होण्यासाठी काय करता येईल..? यासाठी मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली

व सदर प्लॅन्टची क्षमता आणि तांत्रिक बाबींची माहिती घेतली.सदर प्लॅन्ट सुरू करण्यासाठी प्लॅन्ट चालकांचे प्रयत्न सुरू होते ,

परंतु कार्यवाही अधिक वेगाने होण्यासाठी आदरणीय मा.आ.सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.श्री.राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्याशी संपर्क केला आहे व हा प्लॅन्ट वैद्यकीय वापरासाठी सुरू होण्यासाठी एफ.डी.ए आणि इतर शासकीय परवाने देण्याची मागणी केली आहे.

त्यावर दोन दिवसात सर्व परवानग्या देतो असे मंत्री महोदयांनी सांगितले आहे.त्यानुसार हा प्लॅन्ट लवकरच सुरू होऊन रोजची ६०० ते ७०० ऑक्सिजन सिलेंडर निर्मिती होणार असून आपल्या कोपरगावसाठी प्राधान्याने जास्तीत जास्त ऑक्सिजन सिलेंडर मिळावे असा आग्रह मी संबंधित प्लॅन्ट चालक यांच्याकडे धरलेला आहे.आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या कार्यास यश मिळेल व पंचक्रोशीतील तालुक्यांसह आपल्या कोपरगाव वासीयांसमोर आलेले ऑक्सिजन तुटवड्याचे संकट निवारेल आणि रुग्णांचे होणारे हाल थांबतील अशी माझी भावना आहे..!!”

  • विवेकभैय्या कोल्हे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *