सर्व शासकीय इमारतींना निधी मिळवून देऊ:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- ज्याप्रमाणे माजी आ.अशोकराव काळे यांनी कोपरगाव शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आदी प्रशासकीय इमारती उभारून कोपरगाव शहराच्या वैभवात भर घातली. तोच वारसा पुढे चालवून सर्व शासकीय इमारतींसाठी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या नवीन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व फायर ब्रिगेड इमारतीचे लोकार्पण नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या उपस्थितीत पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, प्रशासकीय इमारती शहराचे वैभव असतात या इमारती सुरक्षित राहण्यासाठी तसेच या इमारतींचा दुरुपयोग होणार नाही याची प्रशासन व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. वाचनालयाच्या इमारतीची फर्निचरची गरज लक्षात घेऊन वाचनालयाच्या फर्निचरसाठी व विविध प्रकारच्या पुस्तकांसाठी निधी देऊ. या वाचनालयातून चांगले विद्यार्थी व नागरिक घडतील चांगले अधिकारी घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशासनाने सर्व शासकीय इमारतींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व सिक्युरिटीची व्यवस्था करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, सौ. प्रतिभा शिलेदार, वर्षाताई गंगूले, सौ. माधवी वाकचौरे, सौ. वर्षा शिंगाडे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, संदीप देवळालीकर, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, निखील डांगे, कार्तिक सरदार, मन्नू कृष्णानी, चेतन खुबाणी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. अमोल अजमेरे, रमेश टोरपे, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, ऋषिकेश खैरनार, सौ. रेखा जगताप, मायादेवी खरे, बोर्डेताई, साळवेताई, मनोज कडू, आकाश डागा, राजेंद्र आभाळे, दिनेश पवार, गणेश लकारे, सागर लकारे, किशोर डोखे, राजेंद्र त्रिभुवन, इम्तियाज अत्तार, विकास बेंद्रे, संतोष शेलार, शुभम लासुरे, महेश उदावंत, संदीप सावतडकर, मुकुंद इंगळे, विकि जोशी, कैलास मंजुळ, योगेश वाणी, चांदभाई पठाण, एकनाथ गंगूले, सोमनाथ आढाव, किरण बागुल, योगेश नरोडे, मनोज शिंदे, दळवी, रवींद्र राऊत, रोशन शेजवळ, राजेंद्र फुलफगर, अंबादास वडांगळे , कुलदीप लवांडे, संतोष बारसे, राजेंद्र जोशी, प्रतिक रुईकर, आनंद जगताप, अमोल गिरमे, रामदास केकाण, श्रेणीक बोरा, शंकर घोडेराव, अक्षय आंग्रे, किरण बागुल, दादा पोटे, सचिन परदेशी, योगेश वाणी, भाऊसाहेब भाबड, लक्ष्मण सताळे, फिरोज पठाण,रोहित खंडांगळे, चंदर धोत्रे, संतोष दळवी, प्रदीप कुऱ्हाडे, अमित आगलावे, रविंद्र देवरे, बाळासाहेब शिंदे, प्रताप गोसावी, मुन्ना पठाण, अमन मणियार, राहुल राठोड, अय्युब कच्छी, मनोज शिंदे, राजेंद्र उशीरे, राकेश शहा, शिवाजीराव कुऱ्हाडे, जनार्दन शिंदे, मनोज नरोडे, गोडसे, प्रताप महाले, संतोष शेजवळ, रवींद्र बागरेचा, युसूफ शेख, गोरक्षनाथ कानडे, बाळासाहेब पवार, रहेमान कुरेशी, वैभव विदुर, तुषार साठे, अमोल चोपदार, आसिफ रंगरेज आदींसह नागरिक उपस्थित होते.

चौकट:- कोपरगाव नगरपालिकेच्या आग्रहास्तव लोकप्रतिनिधी या नात्याने शासकीय इमारतींच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलो. सत्ता नसतांना देखील तहसील कार्यालयात नागरिकांची होत असलेली हेळसांड ओळखून स्वखर्चातून नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडे दिले आहेत. तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या फर्निचरसाठी निधी मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरु असून लोकप्रतिनिधी या नात्याने वाचनालयाला देखील फर्निचर व पुस्तकांसाठी निधी देणार:- आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *