गरजवंताची दिवाळी गोड करण्याचे कार्य प्रेरणादायी:- राजेश परजणे ; वारीत टेके पाटील ट्रस्टकडून कपडे, मिठाई वाटप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :-आपण किती जगलो यापेक्षा जेवढं जगलो ते कसं जगलो हे जास्त महत्वाचे आहे. त्या नुसार माझा तरुण सहकारी राहुल टेके याला खूप कमी आयुष्य मिळाले, परंतु; मिळालेल्या आयुष्यात त्याने समाजासाठी केलेलं काम हे खूप महत्वपूर्ण होते. आजही त्याच्यानंतर त्याच्या समाजसेवेच्या कार्याचा वसा राहुलच्या स्म्रुतितून गेली चार वर्ष सातत्यानं वारी गावात सुरू आहे. हि बाब अत्यंत महत्वाची आहे. दिवाळीनिमित्त योग्य लाभार्थ्यांना वस्त्र व मिठाई वाटप करून त्यांचा दिवाळसण गोड करण्याचे हे सामाजिक बांधिलकीचे कार्य हे अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरोद्गर गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी काढले.


कोपरगाव तालुक्यातील वारी येथे सालाबादप्रमाणे राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळीनिमित्त बुधवारी (दि.३०) ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या स्मरणार्थ वारी परिसरातील जवळपास ७१ लाभार्थ्यांना राजेश परजणे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन वस्त्र व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके होते. याप्रसंगी माजी उपसरपंच रामदास सोनवणे, माजी सरपंच हिंमतराव भुजंग, कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राहुल टेके यांच्या आठवणींना उजाळा दिला. या उपक्रमाचे यंदाचे हे चौथे वर्ष होते. या उपक्रमात कोपरगाव येथील प्रदीप भंडारी यांचे विषेश सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके, बाजार समितीचे संचालक प्रकाश गोर्डे, माजी सरपंच हिंमत भुजंग, सतीशराव कानडे, माजी उपसरपंच रामदास सोनवणे, विद्यमान उपसरपंच विजय गायकवाड, सदस्य अनिल गोरे, विशाल गोर्डे, वाल्मिक जाधव, दौलत वाईकर, योगेश झालटे, प्रणाली देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष अरुण कदम, डॉ. हिमांशू त्रिवेदी, डॉ. निलाक्षी फुसे, डॉ. आंचल गांधी, नरेंद्र ललवाणी, मदन काबरा, अशोक टेके, तान्हाजी थोरमिसे, उत्तमराव वाकचौरे, दिलीप गडकरी, राजेद्र मुरार, गणेश भाटी, बापूराव बहीरमल, संतोष भाटे, दिपक झालटे, दिनेश निकम, रामक्रुशन तायडे, विजय ठाकरे, फकिरा चंदनशिव, जनार्दन औंसरमोल, किसन पगारे, हुसेन शेख, स्मिता काबरा, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, दिलीप देशमुख, विलास गोंडे, शंकर महाराज गोंडे, मधुकर सोनवणे, स्वप्निल टेके, अजिम शेख, अशोक निळे, रघुनाथ आहेर, महेंद्र महाले, भिमा तपासे, जयसिंग बनगैया, राहुल जाधव, ओंकार वाईकर, नामू शिंदे, आकाश निळे, अविनाश दुशिग, आदित्य निळे, केतन भारूड, राहुल त्रिभुवन, युन्नुस शेख, साहिल शेख, योगेश माने, सुंदर पगारे, चेतन सुरासे, शंकर धामणे, भैय्या रोकडे, सक्षम आवारे, अमित झालटे, किरण टेके यांच्यासह ट्रस्टचे सर्व स्वयंसेवक, राहुल (दादा) मित्र मंडळाचे सर्व सदस्य, वारी गावातील सर्व कौटुंबिक सदस्य, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार रोहित टेके यांनी तर माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख टेके यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *