ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखालील कोपरगांव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगांव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन आयोजित ग्राहक सन्मान २०२४योजनेच्या हॅट्ट्रिक ने स्थानिक बाजारपेठेला बळकटी:-व्यापारी महासंघ उपाध्यक्ष नारायण अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहर आणि तालुका पर्जन्य छायेचा भाग असतांनाच तालुक्यातील मध्यभागातून वाहणारी देशातील २ नंबरची सर्वात मोठी गोदावरी नदी , पाच कालव्यांचे लाभ क्षेत्रांचे लाभधारक असतांनाच जायकवाडी धरण आणि वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक करणाने नासिक, संभाजी नगर, जालना या भागात बळजबरीने पाणी वळविले गेल्यावर हा परिसर कायमस्वरूपी दुष्काळाच्या खाईत लोटला गेला. याची झळ सर्व सामान्य जनते प्रमाणे कोयटे कुटुंबियांना सहन करावी लागली वास्तविक पाहता कोयटे कुटुंब धनवान नसल्याने अनंत त्रास सहन करावा लागला. स्वतः एकट्याचे बळावर हीअत्यंत प्रतिकूल परिस्थिती सुधारु शकत नसल्याने कोयटे कुटुंबांने सहकारी चळवळीत स्वतःला झोकून दिले. प्रारंभी ओमप्रकाश कोयटे यांनी .न डगमगता सर्व थरातील हातावरील आपला संसार गाडा रेटणाऱ्या समवयस्क युवकांना संघटित केले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष,नगर पालिका, लिंगायत समाज विविध सामाजिक कार्यात स्वयं प्रेरणादायी सहभाग, तालुका मर्चंट बॅंक, आदी स्तरावरील संस्था माध्यमातून युवकांची साथ लाभली. अल्पावधीत स्वबळावर जिवा -भावाचे मित्र कमावले ‌. समता सहकारी पतसंस्था स्थापना केली कोपरगाव किराणा मर्चंट असोसिएशन आणि कोपरगांव व्यापारी महासंघ स्थापन केला . या तीन संस्थांच्या माध्यमातून कायम दरवर्षी विविध उपक्रम राबविल्याने या संस्था लोकमान्य झाल्या आज समता पतसंस्था आणि समता इंटरनॅशनल स्कूल यांच्या यशस्वी वाटचालीमुळे जगात कोपरगांवकरांची मान ताठ झाली आहे.
महापूर , दुष्काळ कोरोना, नैसर्गिक व मानवी संकटात या संस्थांचे पदाधिकारी, सदस्य स्वतः भरडले असतांनाही कोपरगांव शंहर व ग्रामीण भागातील जनसामान्यांसाठी सर्वस्व पणाला लावले.
सध्या ऑनलाईन खरेदीने देशातील शहरी आणि ग्रामीण बाजारपेठ रसातळाला जात आहे. या खरेदीने जनता फसवणूक व लूटीनेउध्वस्त होत आहे या संकटातून जनतेला वाचविण्यासाठी ओमप्रकाश कोयटे यांनी स्थानिक पथारी ते मॉल , शोरुम व्यापाऱ्यांना संघटीत करून ग्राहक सन्मान योजना त्यांच्या गळी उतवली, एवढेच नव्हे तर समता पतसंस्था पुढाकारातून सुधीर डागा प्रदिप साखरे, राजकुमार बंब आदिंच्या साथीने यशस्वी राबवली. दोन्ही वेळी साध्या २०रुपयांच्या पणत्या,लक्ष्मी (झाडू ) तसेच हजारो रुपयांच्या किराणा,जिवनावश्यक वस्तू फर्निचर, आदींच्या खरेदीमुळे हजारो ग्राहकांनीही हजारो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली. ग्राहकांना कमी खर्चात आणि श्रमात चांगल्या वस्तू मिळाल्या . व्यापारी जास्तीत जास्त माल विक्रीमुळे सुखावले अशा पध्दतीने सर्वांच्या घरात दिवाळी आनंदात पार पडली . याचमुळे यावर्षी ग्राहक व व्यापारी यांच्या मध्ये सहभागी होण्यासाठी चुरशीची चुरस लागली आहे.
ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखालील कोपरगांव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनचे सध्याचे या तीन संस्थांच्या कार्यात स्व. मोहन झंवर आणि स्व. रामूशेठ मुंदडा यांची प्रकर्षाने उणीव भासत आहे.

      यावर्षी ग्राहक सन्मान २०२४च्या सहभागी व्यापाऱ्यांना १)१०० बक्षीस कूपनांचे प्रत्येकी ३ बुक घेणाऱ्यांना बक्षिसांची हमी असलेल्या २ ट्रॉली बॅग ड्रा काढून दिल्या जातील व ते कुपन बंपर ड्राला देखील टाकण्यात येईल

२) कुपन बॉक्स,ड्रा बॉक्स , योजना स्टिकर आदी साहित्य समता सहकारी पतसंस्था मध्ये श्री. सतिश निळकंठ यांचें कडून घ्यावयाचे आहे.
३) प्रत्येक कुपनवर आपल्या दुकानाचा शिक्का मारणे आवश्यक आहे
४) ग्राहकांना किती रुपयांचे खरेदी वर किती कुपन द्यावयाचे आहे हा निर्णय व्यापारी बांधवांनी घ्यायचा आहे
५) ग्राहकांना बुकमधील पूर्ण कुपन दिल्यावर त्यातील निम्म्या भागावर ग्राहकाने आपले नांव व आपला स़ंपर्क ऩंबर टाकूनच हा निम्मा भाग ड्रा बॉक्समध्ये टाकावयाचा आहे. व राहिलेले अर्धे कुपन ग्राहकांना बक्षीस स्वीकारताना दाखवणे आवश्यक आहे.
६) गरजेनुसार व्यापाऱ्यांना बक्षीस कुपना़चे जादा बॉक्स महासंघा कडुन मागणी नुसार दिलें जातील.
७) अधिक माहिती महासंघाचे पदाधिकारी आणि सतीश निळकंठ यांच्या कडे मिळेल
संपर्क मोबाईल नंबर ९९६०१२१३८१ वर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या योजनेत मोटारसायकल,टि.व्ही. फ्रिज, मोबाईल,नथ,मिक्सर, ओव्हन,होम थिएटर, वॉशिंग मशीन, ट्राली बॅग आदी स्वरूपात ग्राहकांना सर्व प्रकारच्या खरेदीतून हजारो रुपयांच्या ६०० पेक्षा जादा वस्तू बक्षिसरूपाने मिळणार आहे अशा पध्दतीने मागील सर्वं अनुभव गाठीला बांधून आयोजकांनी मोठ्या प्रमाणावर बदल करून ग्राहक सन्मान योजना २०२४ राबविण्यासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह नियोजन केले असल्याने जास्तीत जास्त
जास्तीत जास्त ग्राहकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेत पथारी ते मॉल शोरुम व्यापाऱ्यांकडून दिपावली निमित्त गरजेचा माल खरेदी करून कोपरगांव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे ग्राहक सन्मान योजना २०२४ मध्ये सहभागी होऊन बक्षीस लयलुटीचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नारायण अग्रवाल यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *