कोविड रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोविड साथीच्या आजाराचा उद्रेक झाला असून अनेक गोरगरीब रुग्णांचा उपचारा अभावी मृत्यू होत आहे त्यामुळे सर्वच शासकीय व खाजगी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की केंद्र सरकारनने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून महाराष्ट्र सरकारने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना असं ठेवलं.या योजनेद्वारे राज्यातील पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ऐनवेळी कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यासाठी धावपळ करावी लागते. ही धावपळ होऊ नये आणि योजनेचा लाभ व्हावा म्हणून आवश्यक कागदपत्रं तुमच्याकडं असणं आवश्यक आहे.
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा उद्देश राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणा साठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये मर्यादा आहे. मात्र सद्या कोविड साथीच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे एखादी व्यक्ती किंवा कुटुंबा तील सर्वच सदस्य या आजारांनी बाधित होत आहे त्यामुळे या कुटुंबापुढे औषध उपचार व वेळेवर आर्थिक कारणामुळे उपचार घेता येत नाही त्यामुळे मृत्यू दर वाढून भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे
गोरगरीब कुटुंबांना तर खाजगी रुग्णालयाचे खर्चाचे आकडे पाहूनच धडकी भरली आहे त्यामुळे शासनाने सर्वच सरकारी व खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोविड बाधित व्यक्तींना महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जनाआरोग्य योजनेतून सर्वच खाजगी रुग्णालयात मोफत उपचार करून कोविड बाधित रुग्णांना दिलासा द्यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *