
कोपरगाव प्रतिनिधी:-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी तालुका कोपरगाव येथील प्राथमिक शिक्षक श्री. संतोष नवनाथ पारासुर यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान ता.श्रीरामपूर यांच्या वतीने त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मा.श्री लहुजी कानडे , मा.श्री.रोहित वाकचौरे,मा.श्री सागरजी वैद्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य मा.श्री.प्रभाकर तावरे मा. डॉ. वंदनाताई मुरकुटे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांनी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आनंददायी कृतीयुक्त अध्यापनातून मुलांना अध्यापनाची गोडी लावली.
