
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील , कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी, येथे भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय. श्री. चंद्रशेखर कुलकर्णी साहेब उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारत हा वेगवेगळ्या जाती-धर्मांचा एक देश आहे. आपल्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थी ,शिक्षक यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. भविष्यात विद्यार्थ्यांमुळेच आपला देश प्रगतीपथावर जाणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन देश हित साधावे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री. बारे. एन. जी. सर यांनी सांगितले की, आजच्या या आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये सैनिक, नागरिक ,शेतकरी सर्वसामान्य या सर्वांचे योगदान बहुमूल्य आहे .म्हणून आपला देश आज प्रगती पथावर जात आहे असे यावेळी ते म्हणाले.
याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मा. श्री.रामभाऊ गाढे यांनी सांगितले की, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे व क्रांतिकारकांचे बलिदान आपण नेहमी स्मरण ठेवून आदर्श देश आपण घडवूया असे उद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये कु.बारगळ पुनम माधव. व कुमारी वाकळे पल्लवी या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार रणधीर सर यांनी मानले. याप्रसंगी मा. श्री अरुण भाऊ भाकरे मा. श्री. विक्रम गाढे सर्व मान्यवर पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
