लायन्स मूकबधिर अपंग विद्यालयात झेंडावंदन उत्साहात साजरा:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
१९८४ साली स्थापन झालेल्या मूकबधिर विद्यालय , ब्राईट माईंड ग्लोबल स्कूल व पोद्दार जम्बु किड्स या विद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मूकबधिर व छोट्या बालगोपाल मुला मुलींच्या समवेत ध्वजारोहण करताना वेगळाच खूप आनंद झाला असे उद्गार मंगेश पाटील यांनी काढले.


पुढे बोलताना मंगेश पाटील म्हणाले की मूकबधिर मुलांचे गणवेश जे की शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ९ वीतील मुलांनी आपल्या पॉकेट मनी मधून सेविंग करून या सर्व लहान मुला मुलींना खूप छान असे ड्रेस दिले. मोठ्या मुलांनी छोट्या मुलांना आपल्या सेविंग मधून घेतलेले हे ड्रेस निश्चित कौतुकास्पद आहे. ब्राईट माईंड ग्लोबल स्कूल व पोतदार जम्बो किड्स च्या छोट्या मुला मुलींनी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याच्या निमित्ताने सोल्जर्स , स्टेनगंनधारी कमांडो ड्रेस मध्ये खूप छान दिसत होते. त्यांनी स्टेजवर जे स्पीच व डान्स केला, तसेच मूकबधिर मुलांनी संगीताच्या तालावर जे लेझीम खेळले ते बघून त्यांचा अत्याधिक आनंद आम्हा सर्वांना झाला. तसेच सर्व शिकवणारे शिक्षक यांच्या कामाचे व ते घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. तसेच आगदी छान पद्धतीने चेअरमन अशोकराव रोमारे साहेब ,सचिव संजीव जी कुलकर्णी व सर्व ट्रस्ट मेंबर व स्थानिक स्कूल कमिटी चे अध्यक्ष सुधीरजी डागा व स्कूल कमिटी मेंबर हे करत असलेल्या मुलांमुली करिताच्या कामाचे कौतुक केले.


यावेळी जवाहर शेठ शहा , डॉ.तुषार गलांडे , ॲड.मनोज कडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक अनुप कातकडे , या संस्थेचे फाउंडर मेंबर सदस्य जवाहर शहा , लायन्स क्लबचे अध्यक्ष मनोज कडू , सचिव डॉ. तुषार गलांडे , न्यू चे अध्यक्ष धीरज कराचीवाला , ट्रेझर कैलास नागरी , ज्येष्ठ सदस्य तुलसीदास खुबानी , आर.टी.पटेल , दिलीपराव वाबळे , दुशिंग भाऊसाहेब , श्याम जंगम , अनिकेत भडकवाडे , मानस नागरे , पृथ्वी शिंदे , कैलास नागरे , संदीप राशीनकर , मोहन उकिरडे यांसह मुख्याध्यापक एकनाथ घोलवड सर , प्राचार्य श्रीमती नेहा पहाडे मॅडम , प्रचार आरती बबं मॅडम , रमेश टिकल सर यांचं सर्व शिक्षक शिक्षिका वर्ग , सर्व स्टाफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण डुकरे सर यांनी केले.
यावेळी उद्योजक अनुप कातकडे व गोदावरी बायोरीफायनरीज प्रा.लि साखरवाडी यांच्याकडून विद्यार्थ्यांना गणवेश बूट , सॉक्स व खाऊचे वाटप करण्यात आले.
असं ७८ स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *