कोपरगांवच्या सोमेश्वर महादेवाला स्वातंत्र्यदिनी तिरंगा सजावट प्रवेशद्वारावर तोरण ; श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानची राष्ट्र उपासना…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील जुने गावठाण,सराफ बाजारातील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव शिवलिंगास फुलापानांच वापर करुन तिरंगा रंगात सजविले आहे…भारत ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमेश्वर देवस्थानचे वतीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत…
परमारांचा राजा भोज यांचे वंशज मानले गेलेल्या धार-देवास संस्थानचे श्रीमंत पवार यांची कारकीर्द ईतिहासात अजरामर आहे…शहाजीराजे भोसले,छत्रपती शिवाजीराजे महाराज,श्रीमंत पेशवे या सर्वांच्या कालखंडात पवार घराण्याचे स्वराज्य आणि सुराज्य लढाईतील योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.पाणिपत येथील रणसंग्रामात श्रीमंत पवारांची शानदार शौर्य गाजवणारी कामगिरी राहिली आहे.श्रीमंत पवार सरकार संस्थानचे कालखंडात त्यांचे अधिपत्याखाली असलेल्या गावांचा कारभार अतिशय उत्तम आणि सर्वसमावेशक समजला जातो.भारत स्वातंत्र्यानंतर श्रीमंत पवार सरकार संस्थान मध्यभारत संघात विलीन झाले…
स्वातंत्र्यपुर्व काळात कोपरगांव नगरीचा कारभार पहाणारे श्रीमंत महामहीम पवार सरकार यांनी कोपरगांव तालुक्यात सोमेश्वर महादेव (गावठाण,सराफ बाजार), श्रीमंत महादेव (संजीवनी पार जवळ, बेट-कोपरगांव) ,गंगेश्वर महादेव (जेऊर कुंभारी, कोपरगांव) अशा तीन महादेव महादेव मंदिराची उभारणी केली. कोपरगाव नगरीतील धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले गेलेले सोमेश्वर महादेवावर आजही ग्रामस्थांची मोठी श्रध्दा आहे…कोपरगाव शहरात जल संकटात या महादेव मंदिराचा गाभारा पाण्याने पुर्ण भरल्यानंतर सोमेश्वर महादेव जल संकटात धावून येतो.अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे…
भारत ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापासून हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद देत कोपरगांव तालुक्यातील तीनही महादेव देवस्थान येथे राष्ट्रध्वज फडकविला आहे. सोमेश्वर महादेवास नैसर्गिक फुलांचा वापर करुन तिरंगा रंगात सोमेश्वर महादेव शिवलिंग सजविले आहे…तसेच प्रवेशद्वारावर तोरण बांधले आहे..
अध्यात्मिक भक्ती ईतकीच राष्ट्र भक्ती महत्वाची असल्याचा संदेश या निमित्ताने श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव मंदिर व्यवस्थापनाने दिला आहे…
श्रीमंत पवार सरकार महादेव देवस्थानचे कार्यात योगदान देणा-या सर्व भक्तांचे व्यवस्थापन यांनी आभार मानले आहे. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत…

सत्यमशिवमसुंदरम्…

भारतमाताकि_जय…

जय_हिंद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *