
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील बैलबाजार हा रस्ता शहरातील उपनगरांना जोडणारा रस्ता आहे. यामध्ये प्रामुख्याने निवारा, खडकी, सुभद्रानगर, ओमनगर, गवारेनगर, शंकरनगर व इतर उपनगरातील लोकांसाठी हा सोयीचा मार्ग आहे.या रस्त्याचे काम जवळपास एक वर्षापासुन बंद पडलेले आहे. नगरपालिकेला १७ डिसेंबर रोजी निवेदन दिले होते व त्या नंतरही वारंवार तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही, ठेकेदारालाही खुप वेळेस सांगितले काम चालु करा परंतु त्यांच्या कडुन काहिच प्रतिसाद मिळत नाही. या रखडलेल्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मोठमोठ्या कपारी आणि पडलेल्या खड्यांमुळे तसेच स्पिडब्रेकर नसल्याने सतत अपघात घडत आहेत. तरी नगरपालिका प्रशासनास विनंती आहे की बैलबाजार रस्त्याचे काम त्वरित चालु करावे.अन्यथा १ मे महाराष्ट्र दिनांक रोजी नगरपालिके समोर धरणे आंदोलन करणारअसल्याची ईशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
