
कोपरगाव प्रतिनिधी:-
माननीय जिल्हाधिकारी साहेब, “लॉकडाऊन” हा जर कोरोना वर विलाज असता तर गेल्यावर्षी संपूर्ण भारत आठ महिने कडकडीत बंद होता, त्यावेळी खरं तर कोरोना पूर्णपणे हद्दपारच व्हायला हवा होता उलट तो वाढतच गेला. साहेब आपला लॉकडाऊन चा निर्णय म्हणजे “रोगापेक्षा इलाज भयंकर” असा प्रकार झालाय. आपल्या निर्णयाने कोरोना कमी होईल की नाही हे सांगता येणार नाही परंतु गेल्या वर्षभरापासून कर्जबाजारी होऊन हवालदिल झालेला शेतकरी, उद्योजक व्यापारीवर्ग, हातावर पोट असणारा मजूर वर्ग आणि सर्वसामान्य यांचं कंबरडे मोडून ते कोलमडल्या शिवाय राहणार नाहीत. तेव्हा सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी लॉकडाऊन चा निर्णय मागे घ्यावा हिच विनंती .
कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती…
