साईसेवा भक्त मंडळाचा पंढरपूर वारी मध्ये मेडीकल कॅम्प…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सन २०१३ पासून साईसेवा भक्त मंडळ आळंदी ते पंढरपूर ह्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीला मेडीकल कॅम्पची सेवा देत आहे.. दर वर्षी मौजे वेळापूर ता अकलूज येथे आम्ही मेडीकल कॅम्प करतो..
आमच्या साईसेवा भक्त मंडळाचे एका सदस्याचे मित्र आळंदीचे विठ्ठल महाराज.. महाराजांनी वेळापूर मुक्कामात वारकऱ्यांना सेवा द्यावी असा आग्रह धरला.. आम्ही भक्त मंडळाने ठरवले कॅम्पला जायचे..
मी व आमचे काही मेडीकल रिप्रेझेटेटीव्ह मित्रांनी स्वत: कडचे व डॉक्टरांकडचे सॅम्पल गोळा केले.. काही मेडीकल वाले.. व्होलसेल वाले मदतीला धावले.. एका व्यापाऱ्याने आपला टेम्पो दोन दिवस दिला.. काहीच ज्ञान नसताना वेळापूरात कुठलीच ओळख नसताना आम्ही कॅम्पला गेलो.. काही डॉक्टर, काही फार्मसिस्ट व उरलेले सदस्य पाय चोळणे साठी सुरूवात केली.. सेवा देऊन टेम्पोतच झोपायचे व दुसऱ्या दिवशी शेवटच्या वारकऱ्याला निरोप देऊ पर्यंत थांबायचे व परत यायचे..
दर वर्षी हा उपक्रम आम्ही करू लागलो.. आमचा डॉक्टरचा चमू, फार्मसिस्टचा चमू ठरलेला, सेवेकरी सदस्य ठरलेले.. नवीन येणारे उत्सूक खूप आहेत पण नियमावलीत आहे तेच नेण्याचे ठरलेले आहे…
आमच्या मेडीकल कॅम्पसाठी गावातले व बाहेरचे अनेक देणगीदार मदत करतात.. दर वर्षी आम्ही एक पिकअप भरून औषधे नेतो.. पांडूरंग आमचे कडून हि सेवा करून घेतात..
आता गेली पाच सहा वर्ष वेळापूरचे भैय्या मिरगे आमची मदत करतात.. त्यांचेच घरी आमचा सगळ्यांचा मुक्काम.. त्यांचेच घरा समोर आता आम्हाला मेडीकल कॅम्प साठी जागा आहे.. आता खूप संघटना वारकऱ्यांच्या सेवेत उतरल्या.. त्यामुळी स्टॉल साठी जागेची मारामारी भैय्या मिरगेंमुळे मिटली.. त्यांचे रूपाने साईसेवा भक्तमंडळाला पांडूरंग भेटला..
ह्या कॅम्पचे वैशिष्ट्य म्हणजे आमचे साईसेवा भक्तमंडळ कुटुंबाचे सदस्य दर माह ५०० रूपये प्रमाणे वर्षाला ६००० रूपये आपली स्वत:ची गंगाजळी जमा करतात.. तशी आमची संस्था नोंदणीकृत संस्था आहे.. आमचे दानशूर दाते आमचे संस्थेच्या खात्यावर परस्पर देणगी पाठवतात व औषधे संजय काळेंकडे पाठवतात..
ह्या वर्षी वेळापूर मुक्काम १३ जूलैला आहे.. साईसेवा भक्त मंडळ सदस्यात चैतन्य संचारले आहे.. औषधे येऊन पोहचत आहे.. वारकऱ्यांच्या सेवेला जाण्याची लगबग सुरू झाली आहे.. आम्ही वारकऱ्यांच्या सेवेत पांडूरंग शोधतो.. व पांडूरंगाचा आशिर्वाद सेवेचे प्रोत्साहन संधी देणाऱ्या कोपरगावकरां साठी परतीला घेऊन येतो…
रामकृष्णहरी!
श्री साईसेवा भक्त मंडळ कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *