सागर अहिरे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
(कोकमठाण) :- क्रीडा संस्कृती फौंडेशन यांच्या वतीने आत्मा मालिक माध्य.गुरुकुल या शाळेतील शिक्षक याना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध जिल्यातील शिक्षकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते सण २०२४-२५ साठी दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सागर अहिरे यांना पद्यश्री मा. ब्रम्हानंद सांगून कामत शंकरवाल अर्जुन पुरस्कार विजेते यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोरखनाथ बलकवडे शिवछत्रपती पुरस्कार विजेते तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोकजी दुधारे अलोम्पिक निरीक्षक परभणी जिल्हा संघटक सुशील देशमुख यांच्या उपस्थितीत राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले -सागर अहिरे हे गेल्या १८ वर्षांपासून आत्मा मालिक मध्ये शिक्षक म्हणून सेवा देत आहेत आज पर्यंत शालेय स्पर्धा परीक्षा मध्ये मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत निवडले गेले तर संस्थेच्या आध्यत्मिक कार्यात आपले योगदान दिले कोरोना काळात तंत्रस्नेही शिक्षक म्हणून संस्थेसाठी आत्मा मालिक न्युज ची स्थापना केली त्या माध्यमातून शाळेच्या घडामोडी संपूर्ण राज्यात पोहचून शाळेला प्रसिद्धी मिळवून दिली. संस्थेच्या चॅनल चे २१ हजार फोल्लोवॉर्स असून डिजिटल युगात आपल्या कामाचा ठसा उमटवला
पुरस्काराने सन्मानित केल्या बद्दल आत्मा मालिक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी सरचिणीस हनुमंतराव भोंगळे व्यस्थापक सुधाकर मलिक ,साईनाथ वर्पे ,माई पटेल,प्राचार्य निरंजन डांगे ,माणिक जाधव,संदीप गायकवाड,नामदेव डांगे व आत्मा मालिकचे शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *