वारीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा, रामेश्वर विद्यालयात शालेय विध्यार्थ्यांना योगाचे धडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी श्री रामेश्वर विद्यालय वारी येथे भारतीय योग संस्थान दिल्ली संचलित वारी केंद्रांचे योगा शिक्षक वाल्मिक कर्डीलेसर व इतर मार्गदर्शकांच्या उपस्थितीत योगाभ्यास करत साजरा करण्यात आला.
यावेळी योगासने प्राणायाम, ध्यान करत विध्यार्थी,शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी योगा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला.


रयत शिक्षण संस्थेचे श्री रामेश्वर विद्यालय वारी या शाळेच्या प्रांगणात मुख्यध्यापक श्री साळुंके सर यांचे मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यालयाचे शिक्षक श्री कैलास शेळके सर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले यावेळी योग साधकांचा शाल,श्रीफळ, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला


माजी पंचायत समिती सदस्य योग साधक अशोकराव कानडे यांनी भारतीय योग संस्थानच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून निशुल्क सेवा केंद्र वारीत सुरु असुन त्याचा विध्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवहान करुन योगासन, प्राणायाम, ध्यान या संदर्भात शास्त्रोक्त माहिती सांगितली,योगा शिक्षक वाल्मिक कर्डीले सर यांनी उपस्थिताना योग साधनेचे आजच्या जीवनशैली करीता असणारे महत्व पटवून दिले योग शिक्षक प्रा वाल्मिक कर्डीलेसर अशोकराव कानडे,तुपे सर,कु ईश्वरी कानडे, कु कविता टेके,कु श्रेया टेके,,चि पियुष संत यांनी यावेळी योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर केली सुक्ष्म व्यायाम पद्मासन,भुजंगासन शलभासन,त्रिकोणासन,ताडासन,सूर्यनमस्कार ,शवासन,नावासन,अनुलोम विलोम,ओंकार , प्राणायाम पूर्व तयारी यासह योगा संदर्भात शास्त्रोक्त माहिती देवून त्याचे निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी होणारे फायदे सांगितले.याप्रसंगी रामेश्वर विद्यालय वारीचे शिक्षक कैलास शेळकेसर,श्री बर्डे सर,श्री तुपेसर, श्री जाधवसर यांनी विविध प्रात्यक्षिक द्वारे योगासनांची सखोल माहिती दिली यावेळी श्री रासकर सर, श्री जेठेसर, सोनवणे मामा ,शाळेचे विध्यार्थी,विध्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनी योग शिक्षकांकडून मिळालेल्या शास्त्रोक्त माहिती आणि प्रात्यक्षिकाने विद्यार्थी शिक्षक व वारी ग्रामस्थ आदी उपस्थितांनी समाधान व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *