उज्जैन येथील विश्व आयुर्वेद परिषदेच्या गुरुकुल परिषदेत डॉ रामदास आव्हाड सन्मानित…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नुकतीच उज्जैन येथे विश्व आयुर्वेद पारिषद व धन्वंतरी आयुर्वेद चिकित्सा महाविद्यालय उज्जैन तर्फे आयोजित गुरुकुल परिषदेत कोपरगाव येथील सुप्रसिद्ध वैद्य राष्ट्रीय आयुर्वेद गुरु वैद्य रामदास आव्हाड यांचा प्राणाचार्य वैद्य सन्मान पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात आला

.उज्जैन महाविद्यालयातील जेष्ठ संहिताकार वैद्य रामतीर्थ सर आणि प्राचार्य वैद्य चौरसिया यांचे शुभ हस्ते हा सन्मान देण्यात आला .मानपत्र ,स्मृतिचिन्ह ,शाल व कलश स्वरूपातील हा मानाचा सन्मान आहे .या परिषदेमध्ये वैद्य रामदास आव्हाड यांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते .त्यांचे उज्जैन भेटीचे निमित्त साधून उज्जैन आयुर्वेद संमेलन ,निमा ब्रँच ,आयुष जिल्हा वैद्यकीय अधिकारी संघ ,जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांनी ही संयुक्त सत्काराचे आयोजन करून वैद्य आव्हाड यांचा सत्कार केला ..या दोन्ही कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतभरातून आयुर्वेद स्नातक ,आयुर्वेद वैद्य ,पदव्यूत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *