संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- ६ जून रोजी किल्ले रायगडावर तारखेनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या आवरात देखील राजमाता जिजाऊ यांच्या ज्ञानामृतातून जीवन घडलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेच्या सप्तर्षीमळा शाखेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व शाळेच्या शिक्षिका भारती हळगावकर यांनी मुलांना छत्रपती शिवरायांच्या बालपणापासून राज्याभिषेक सोहळ्या पर्यंतच्या इतिहासाची थोडक्यात माहिती दिली व छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या आचरणात आणण्यास सांगितले. तसेच मातोश्रीनगर शाखेत मुख्याध्यापक सचिन मोरे व उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेची इयत्ता नववी मधील विद्यार्थीनी कु.नारायणी शिंदे हिने सर्व मुलांना शिवरायांबरोबर स्वराज्य स्थापनेत ज्या शूरवीर मावळ्यांनी आपल्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता आपल्या प्राणांची आहुती दिली. आशा सर्व मावळ्यांची व त्यांनी केलेल्या कामगिरी ची माहिती दिली. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा देत जल्लोष केला.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *