

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी परिसरात गुरुवारी दोन वाजेच्या सुमारास साधारणपणे एक तास चाललेल्या मुसळधार पावसाने झाडा सोबतच जनावरांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर अचानक आलेल्या वादळासह गरांच्या पावसाने करंजी नऊ चारी या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांचा मोठा खोळंबा झाला होता. तर या वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात कैऱ्या पडल्या आहे तरी प्रशासनाने त्वरित या नुकसानाचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.
