साई सोनवणे या ९ वर्षीय मुलावर एस जे एस रुग्णालयात यशस्वी उपचार ,डॉ.प्रसाद उंबरकरांनी गाठीची शस्त्रक्रिया करून दिले जीवदान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या एस जे एस रुग्णालयात २४ एप्रिल २०२४ रोजी मालेगाव येथील ९ वर्षीय साई सानावणे हा शाळेत खेळात असताना अचानक चक्कर येऊन वेशुद्ध पडला. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला हलवण्यात आले. रुग्णालयात डॉ. प्रसाद उंबरकरांनी त्याला तपासल्या नंतर एम आर आय करण्यास सांगितले. डोक्याच्या एम आर आय मधे खूप मोठी पू ची गाठ असल्याचे आढळून आले. (Brain Abscess) एक मोठ्या आंब्यासारखी १५ बाय १० सेंटीमीटरची ही गाठ मेंदूच्या डाव्या भागात असल्याने त्या ठिकाणी बोलण्याची व हातपायच्या ताकदीचे केंद्र असते.
डोक्यामधून एवढी मोठी गाठ काढणे सोपे नव्हते.खूप अवघड व रुग्णांसाठी खूप जोखमीचे असते. परंतु न्युरोतज्ञ डॉ.प्रसाद उंबरकरांनी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर ९ वर्षाचा साई हा अगदी व्यवस्थित बाहेर आला. या शस्त्रक्रियेसाठी भूलरोगतज्ञ डॉ.विजय कर्डिले, असिस्टंट दीपक थोरात, मुकुंद वैद्य, प्रसाद जपे यांनी मदत केली.एरवी मेंदूतील गाठी लगेच तपासणीमध्ये कळतात परंतु पू ची एवढी मोठी गाठ मेंदूमध्ये होणे हे फार कदाचित बघण्यास येते.त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्याच्यावर जन आरोग्य योजनेत पूर्णपणे मोफत झाले.रुग्णालयातील सर्व डॉक्टर परिचारिका यांनी या साई सोनवणे कडे व्यवस्थित लक्ष दिले.
म्हणून त्याच्या घरच्यांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार व्यक्त केले.आता.एस जे एस रुग्णालयात २४ तास डॉक्टर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात.आता एकाच छताखाली डिजिटल एक्स-रे, एमआरआय, सोनोग्राफी सिटीस्कॅन, अतिशय माफक दरात केले जातात.सुसज्य पॅथॉलॉजी लॅब, ब्लड बँक उपलब्ध आहेत.पिवळे व केशरी रंगाच्या रेशनकार्ड असणाऱ्या रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उपचार पूर्णपणे मोफत केले जातात. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत पणं मोफत उपचार केले जातात.

फोटो ओळी:-
साई सोनवणे सोबत वैद्यकीय संचालक डॉ.विशाखा मधुरकर, परिचारिका अधीक्षक मनीषा बाडगी, डॉ. अनिरुद्ध उबाळे, डॉ.अबोली वानखेडकर,राखी मोल,गौरव शेळके, मच्छिंद्र खरसे, लक्ष्मण पुरे, हेलन प्रमिला, हे अधिकारी दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *