

कोपरगाव प्रतिनिधी:-मर्यादा तालुक्यातील वारीयेथे हनुमान जयंती निमित्ताने येथील मारुती मंदीर मैदान येथे खोलवाट मित्र मंडळ आणि वारी ग्रामस्थ यांच्या वतीने सात दिवसीय संगीतमय तुलसी रामायणाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रसिद्ध रामयनाचार्य ह भ प परशुराम महाराज अनर्थे यांच्या सुश्राव्य वाणीतून हजारो भाविकांनी संगीतमय रामायणकथा श्रवनाचा लाभ घेतला त्यांना गायनाचार्य ह भ प बाबासाहेब महाराज शिंदे,ह भ प विनायक महाराज टेके, बाळासाहेब महाराज शेळके,यश भड मृदुंगाचार्य शंकरमहाराज गोंडे यांनी मोलाची साथ दिली या कार्यक्रमात नाचत फुगड्या खेळत उपस्थित भाविकांनी व उपस्थित महिलांनी कथेचा आनंद घेतला
रामकथा आयोजनाचे हे पहिलेच वर्ष असुन देखील अत्यंत चांगले नियोजन झाल्याने खोलवाट मित्र मंडळाच्या तरुण व पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे

कथा सांगता निमित्ताने प्रसिद्ध भागवताचार्य ह भ प सौ सुरेखाताई टेके महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले
वारी पंचक्रोशीतील भाविक व महिलांनी मोठया संख्येने कथा श्रवणाकरिता सातही दिवस गर्दी केली होती रामकथेमध्ये राम लक्ष्मण सिता, हनुमान, शबरीमाता ही पात्रे तरुणांनी हुबेहूब साकारली दररोज होणारी सामुदायिक सवाद्य आरती आणि महाप्रसाद पंगत असा कार्यक्रम नित्य नेमाने सुरु होता त्यामुळे वारीत वातावरण राममय झाले होते
या कार्यक्रमाला आमदार आशुतोष दादा काळे गोदावरी बायोरिफायणरीजचे डायरेक्टर सुहासजी गोडगे, सरपंच बद्रीनाथ जाधव,माजी पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके अशोकराव कानडे ,नामदेवराव जाधव,ग्रा प सदस्य विशाल गोर्डे,रावसाहेब टेके, आसाराम डहारे सोसायटी चेअरमन नवनाथ अण्णा जाधव, पत्रकार रोहीत टेके, बापु घुमरे आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या
वारी पंचक्रोशीतील सर्व साई भक्त, तरुण मंडळे, सर्व भजनी मंडळ,जय बाबाजी भक्त परिवार स्वामी समर्थ भक्त परिवार,जगदंबा आरती मंडळ, ग्रामदैवत श्री रामेश्वर भगवान मंडळ , स्वाध्याय परिवार अशा सर्व धार्मिक मंडळाच्या व गावातील सर्वधर्मीय ग्रामस्थांच्या सहभागामुळे हा सोहळा यशस्वीपणे पार पडल्याचे सांगत खोलवाट तरुण मंडळाने सर्वांचे आभार मानले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ह भ प शंकरमहाराज गोंडे,ह भ प विनायक महाराज टेके यांचे मार्गदर्शनाखाली नंदकिशोर डहारे ,अंबादास गिरी,रमेश आहेर, ग्रामपंचायत सदस्य अनिल गोरे,अक्षय पवार,श्याम आहेर,भास्कर बोर्डे, अशोक निळे, आप्पासाहेब थोरमिसे,मच्छिंद्र मोरे, संदीप पवार,अभिजित इथापे,सोनु आहेर,सुरज बोर्डे, विशाल सोनवणे,ओम आहेर महेंद्र महाले, सागर शिंदे, संकेत चव्हाणके गणेश आहेर आदींनी विशेष परिश्रम घेतले
