सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती डॉ.धनंजय चंद्रचुड यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन:- जि.मा. अधिकारी सुरेश पाटील…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी
(शिर्डी):-
सर्वोच्च न्यायालयाचे (नवी दिल्ली) ज्येष्ठ न्यायमूर्ती डॉ.धनंजय चंद्रचुड यांनी आज (२६ फेब्रुवारी) शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात जाऊन श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते श्री.साईबाबांची आरती करण्यात आली.

श्री.साईबाबांच्या दर्शनापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे न्यायमूर्ती डॉ.धनंजय चंद्रचुड यांचे आगमन झाले. तेथे त्यांचे स्वागत शिर्डी उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे व प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा यांनी केले.
श्री.साईबाबा मंदिरात संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी कोपरगांव दिवाणी न्यायाधीश व्ही.यू.मिसाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *