माननीय मुख्य सचिव आरोग्य मंत्रालय भारत सरकार श्री अपूर्वा चंद्रा यांची आयुष्मान आरोग्य मंदिर ब्राम्हणगाव येथे भेट…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या ब्राम्हणगाव उपकेंद्र येथे दिनांक ३०/०३/२०२४ रोजी आदरणीय मुख्य सचिव आरोग्य मंत्रालय भारत सरकार श्री अपूर्वा चंद्रा यांनी भेट देऊन तेथे आरोग्य मंत्रालया अंतर्गत सुरू असलेल्या विविध योजनां ग्रामपातळीवर कशा पद्धतीने राबविल्या जातात याची मुख्यत्वे पाहणी केली
उपकेंद्राला आल्यानंतर सरांनी प्रथमतः उपकेंद्र परिसर स्वच्छता तसेच उपकेंद्र इमारत अंतर्गत स्वच्छतेची पहाणी केली.
यानंतर सरांनी उपकेंद्रांतर्गत सुरू असलेली ऑनलाइन कामे म्हणजेच एनसीडी पोर्टल, आरसीएस पोर्टल, एच आय एम आय एस, आय डी एस पी या संदर्भात लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ बरोबर आहेत का (ऑफलाइन तसेच ऑनलाईन)याची माहिती घेतली तसेच कामकाज सुधारणे बाबत उपस्थितांना योग्य ते मार्गदर्शन केले
यानंतर उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी श्री संकेत पोटे यांनी उपकेंद्र अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली विशेष म्हणजे उपस्थित आरोग्य सेविका श्रीमती मैद एस एस यांनी सरांना आर सी एच अंतर्गत सुरू असलेल्या कामाची विस्तृतपणे माहिती दिली तसेच सरांनी उपस्थित आशा सेविका समवेत त्यांच्या कामा संबंधि चर्चा केली.


ब्राह्मणगाव सारख्या ग्रामीण भागात आरोग्य मंत्रालया अंतर्गत सुरू असलेल्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे हे पाहून सरांनी समाधान व्यक्त केले
यावेळी
डॉ, बाविस्कर साहेब अतिरिक्त संचालक महाराष्ट्र राज्य आरोग्य
डॉ,गोविंद चौधरी उपसंचालक कुटुंब कल्याण,पुणे
डॉ,कपिल आहेर उपसंचालक नाशिक विभाग
डॉ,संजय घोगरे जिल्हा शल्य चिकित्सक अहमदनगर
डॉ, बापूसाहेब नागरगोजे जिल्हा आरोग्य अधिकारी अहमदनगर ,
डॉक्टर श्री विकास घोलप तालुका आरोग्य अधिकारी कोपरगाव,
डॉक्टर श्री अनिकेत खोत व डॉक्टर श्रीमती पठाण वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी तसेच संबंधित उपकेंद्र अंतर्गत येणारे समुदाय आरोग्य अधिकारी श्री संकेत पोटे व आरोग्य सेवक श्री शामराव गावडे तसेच उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या आरोग्य सेविका सर्व आशा सेविका यावेळी उपस्थित होत्या.
ब्राह्मणगाव टीमने व्यवस्थित तसेच एकत्रितपणे काम केल्याने उपस्थित सर्व मान्यवरांनी उपकेंद्राच्या कामा संदर्भात समाधान व्यक्त केले
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा उपकेंद्राच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *