कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंकल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव श्री. अपुर्व चंद्रा IAS यांची भेट….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
ग्रामीण रुग्णालय येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंकल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव श्री. अपुर्व चंद्रा IAS यांनी भेट दिली, सर्व कामकाजाची सविस्तर माहिती घेतली पाहणी केली. त्यांनी संपूर्ण ग्रामीण रुग्णालय कोपरगाव एकूण कामकाजाबाबत अतिशय समाधान व्यक्त केले व सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
त्यांचे सोबत राज्य अतिरिक्त संचालक डॉ. बाविस्कर, नाशिक विभागीय उपसंचालक डॉ. कपिल आहेर, पुणे येथील उपसंचालक डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा शल्चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे उपस्थीत होते.


डॉ कृष्णा फुलसौंदर वैद्यकिय अधिकारी यांनी सादरीकरण केले, डॉ. गिरीष गुट्टे वैद्यकिय अधीक्षक ग्रामीण रूग्णालय यांनी नीयोजेन केले.
विशेष म्हणजे श्री अपुर्व चंद्रा हे १९८९ मध्ये कोपरगाव नगरपालिका येथे मुख्याधिकारी म्हणून काम केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *