आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माणसं जगावे म्हणून प्रयत्न व्हावेत:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात व तालुक्यात करोना साथीच्या आजाराचा उद्रेक झाला असून आजी माजी आमदार महोदयांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माणसं जगावेत म्हणून पाऊल उचलावे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील वर्षीच्या तुलनेत सद्या करोना साथीच्या आजाराने रौद्र रूप धारण केले असून त्यात अनेकांचा मृत्यू होत आहे काय केले पाहिजे होते व काय करणार असे म्हणून आजी माजी आमदार महोदय एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहेत मात्र ही वेळ टीका टिपण्णी करण्याची नाही तर आपल्या प्रशासकीय कौशल्य दाखविण्याची आहे कोपरगाव शहरातील अनेक नैसर्गिक आपत्ती मध्ये संजीवनी व कोलपेवाडीची आपत्ती व्यवस्था धावून येते हे कोपरगावच्या जनतेने अनुभवले आहे पूर परिस्थिती व दुष्काळात देखील या दोन्ही साखर कारखान्याच्या माध्यमातून गोर गरीब जनतेस सहारा देण्याचे काम या आजी माजी आमदार महोदयांनी केलेले आहे
शासन आणि प्रशासनाने या साथीच्या उद्रेकात स्वतःचे अंग काढून घेतलेले दिसून येत आहे एवढी मोठी रुग्ण संख्येत वाढ होत असताना प्रशासन कोणतीच ठोस भूमिका घेताना दिसत नाही असे असताना आता कोपरगाव शहर व तालुक्यातील जनते करिता आजी माजी आमदार महोदयांनी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे या दोन्ही कडे संजीवनी व कोलपेवाडी सारखी सक्षम यंत्रणा आहे मोठं मोठे शैक्षणिक संकुलाच्या इमारती आहेत त्यामुळे शासनाच्या मदतीची कोणतीही वाट न पाहता तालुक्याच्या जनतेच्या जीवन मरणाशी न खेळता या संस्थेमध्ये कोविड सेंटरची उभारणी करावी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा तालुक्यातील सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे म्हणून दोन पाऊल पुढे टाकावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *