आज कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचा सोशल मीडिया मेळावा- जिल्हाध्यक्ष म्हस्के….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुका मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोशल मीडिया प्रशिक्षण मेळावा रविवार (दि.१०) रोजी दुपारी २.०० वाजता आयोजित केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वांगीण विकासाचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवार (दि.१०) रोजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे सोशल मीडिया प्रशिक्षण मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी मोठ्या संख्येने कोपरगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *