प्रतिष्ठित व्यापारी स्व.रामनाथजी काबरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- नारायणशेठ अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नुकतेच डॉ.निलेशजी काबरा व प्रसिद्ध व्यापारी संदीप जी काबरा यांचे पिताश्री स्व.रामनाथजी काबरा यांचे अचानक दुःखद निधन झाले ही घटना अचानक घडल्याने सर्वजण सुन्न झाले !
काबरा कुटुंब हे मूळचे वारी ह्या गावातील रहिवासी व्यापार व्यवसाय करता कोपरगाव येथे स्थायिक झाले
स्व.रामनाथजी काबरा उर्फ (काकाजी) अत्यंत शांत संयमी धार्मिक व हसतमुख प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व अत्यंत साधी राहणी व वागण्यात मनाचा मोठेपणा हे त्यांचे वैशिष्ट्ये होते.माहेश्वरी समाजात त्यांना मोठे आधाराचे स्थान होते.
व्यापार करताना सचोटी शिस्त व प्रामाणिकपणा कधी सोडला नाही.
व्यापार हा त्यांच्या नसात नसात भिनला होता अगदी मृत्यूच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते आपल्या दुकानात कार्यरत होते आपल्या दोन्ही मुलांना व मुलीना त्यांनी त्यांना चांगले संस्कार दिले !
डॉक्टर फडके यांच्याकडे कार्यरत असणारे डॉक्टर निलेश काबरा 24 तास उपलब्ध असणारे डॉक्टर म्हणून कोपरगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अपघातानंतर तुरंत सेवा देण्यात कोपरगावकरांना मोठा आधार आहे.
अगदी दोन-तीन दिवसांपूर्वी माजी नगरसेवक श्री.संदीपजी देवकर यांचे पिताश्री श्री.शिवाजीराव देवकर यांच्या अपघातानंतर ताबडतोब डॉ.निलेशजी काबरा यांनी डॉक्टर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा उपलब्ध करून दिली.याचा आम्हाला अभिमान आहे.
व्यापारी श्री.संदीपजी काबरा होलसेल व ड्रायफूट मर्चंट म्हणून नावलौकिक मिळवला आहे. अत्यंत अल्पावधीत त्यांनी व्यापार पेठेत चांगले नाव कमावले आहे.
स्व.रामनाथजी काबरा यांच्या निधनाने कोपरगावकरांचेच नाही संपूर्ण माहेश्वरी समाजाची मोठी हानी झाली आहे.
व्यापाऱ्यांचा एक आदर्श एक मार्गदर्शक गमावला याचे कोपरगावकरांना दुःख आहे.
कोपरगाव शहरातील लहान मोठे व्यापारी व माझ्या अग्रवाल परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!
नारायणशेठ अग्रवाल,कोपरगाव.
मो.9822630330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *