शंकरराव कोल्हेंचे कार्य महाराष्ट्राला दिपस्तंभाप्रमाणे:- जयंत पाटील…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे सहकार, कृषी, शिक्षण, महसूल, सांस्कृतिक, साखर उद्योग, जलसमृद्धी आदी क्षेत्राती कार्य महाराष्ट्र राज्याला दिपस्तंभाप्रमाणे असुन त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढील पिढीने काम करावे हीच त्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
तालुक्यातील येसगाव कोल्हे वस्ती येथे जयंत पाटील यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांचे प्रतिमेचे पुजन करून कोल्हे कुटुंबियांची गुरुवारी सांत्वनपर भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते.
श्री. जयंत पाटील पुढे म्हणाले की, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या प्रत्येक कार्यात कोल्हेंनी नेहमी साथ दिली. रचनात्मक कार्यामुळे शंकरराव कोल्हे यांचा अहमदनगर जिल्हयांत दबदबा होता. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी राज्याच्या विधीमंडळात पोहचवून त्यांच्यासाठी उमेदीने काम केले. आम्हा तरुणांना वाव देत त्यांनी वेळप्रसंगी स्वतः माघार घेत मार्गदर्शन केले. वडीलकीच्या नात्याने त्यांनी मला विधीमंडळात मोलाची साथ दिली. साखरेच्या प्रत्येक प्रश्नांवर त्यांची कमांड होती. साखर उद्योगात त्यांच्या ज्ञानाचा प्रत्येक शब्द सर्व सहकारधुरीणiना अंतिम असायचा. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या असंख्य सुंदर आठवणी आहेत असेही ते म्हणाले.

फोटो ओळी:- कोपरगाव
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येसगाव कोल्हेवस्ती येथे येऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *