
कोपरगाव प्रतिनिधी:- चास (नळी) येथील कै सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे स्मरणार्थ निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात दगडुजी पाटील तिडके विद्यालयातील विद्यार्थीनींनी भाग घेतला . इयत्ता दहावीची विद्यार्थीनी
कु. भाकरे अनुष्का दत्तात्रय हिने प्रथम क्रमांक मिळवला तर कु. शेळके श्रद्धा सुरेश हिने द्वितीय तर कु. सानप हर्षदा सतिश हिने तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थीनींना रोख रक्कम
व प्रशस्तिपत्र यांचे वितरण पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीराम मंगल कार्यालयात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभास गावकऱ्यांनी हजेरी लावली. इद्रीस मोमीन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
बक्षीसपात्र विद्यार्थीनींचे कृष्णा चांदगुडे, किरण चांदगुडे, विजय चव्हाणके, ज्ञानेश्वर चांदगुडे, कमलेश गायकवाड यांनी कौतुक केले.
