भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिवस संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे खुप उत्साहात साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :-

कोपरगांव येथील नावाजलेल्या संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 75 व्या प्रजासत्ताक दिनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना चे उपा- ध्यक्ष श्री. मनीष गाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट ट्रस्टी सौ. रेणुका ताई विवेक भैया कोल्हे व प्राचार्य मोहसीन शेख सर, यांच्या मार्गदर्शनाने परेड, लेझीम, नृत्य, संविधान नाटिका, योगा, भाषणे अशे विविध प्रकार साजरे केले.या वेळी मुख्य अतिथी मनीष गाडे बोलले की आज विद्यार्थ्यांनी जे विविध आविष्कार सादर केले याचे श्रेय सर्व शिक्षक, शिक्षिका यांना जाते! अध्यक्षीय भाषणात रेणुका ताई विवेक भैया कोल्हे बोलल्या की आदरणिय दिवंगत माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांनी ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी भाषेत शिक्षण मिळावे या उद्देशाने ही शाळा सुरू केली असून आज शाळा प्रगतीपथावर आहे
शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे, लेझीम, नृत्य, योगा, संविधान नाटिका,देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
या कार्यक्रमाला सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना चे सदस्य निवृत्ती बनकर, संजयराव होन, घोडेराव, कानवडे साहेब, प्रदीप गुरव साहेब, अकॅडमी हेड नळे, पालक,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शन प्राचार्य मोहसीन शेख सर यांनी केले.. शाळेतील विद्यार्थ्यांना या वेळी खाऊ चे वाटप करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *