वडगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. अरुणा केदार यांची बिनविरोध निवड….

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. अरुणा गोपीनाथ केदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी ही निवड घोषित केली.वडगांव ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सांगळे, सदस्य प्रविण कांगणे, जनार्दन कांगणे, शरद वाकळे, सौ. रंजना राजेंद्र सोनवणे, सौ, सरला केशव डोंगरे, सौ. उज्ज्वला शंकर माळी यांच्या उपस्थितीत बुधवार दि. २४ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी सौ. अरुणा गोपिनाथ केदार यांच्या नांवाची सूचना सदस्या सौ. उज्ज्वला शंकर माळी यांनी मांडली तर त्यास सौ. रंजना राजेंद्र सोनवणे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी सौ. केदार यांचे नांव घोषित केले. सौ. अरुण केदार या गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे व्हाईस चेअरमन गोपीनाथ केदार यांच्या पत्नी आहेत.उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर सौ. केदार यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर सत्कार केला. या निवडीबद्दल सौ. केदार यांचे राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शानिलीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, अहमदनगर जिल्हा वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रभाकर महाराज बारगळ, सरपंच संदीप सांगळे, माजी उपसरपंच प्रवीण कांगणे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *