राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थ्यांचे विद्यापीठ पातळीवर निवड….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :- जळगाव येथे झालेल्या DBATU विद्यापीठाच्या अंतर विभागीय फेन्सिंग स्पर्धा मध्ये कु. कार्तिक मोरे यांनी प्रथम क्रमांक व कु.यशराज पानसरे आणि कु. दर्शन नाईक यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तसेच कु.भुजबळ साईराज याचे इंद्रायणी महाविद्यालय पुणे मध्ये क्रिकेट मध्ये निवड झाली. सर्व विजेत्यांचे DBATU विद्यापीठामध्ये निवड झाल्या बद्दल आर. जे. एस ग्रपू ऑफ इन्स्टिट्यूट व आर.जे.एस स्पोर्ट्स क्लब तर्फे हार्दिक अभिनंदन केले. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रमा सोबतच विद्यार्थ्यांचा बौद्धिक क्रीडा आणि कलात्मक असा सर्वागीण विकास व्हावा यासाठी सर्व शिक्षक वर्ग नेहमी प्रयत्नशील असतात तसेच संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे हे नेहमी त्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन, कला आणि क्रिडा गुणांचा विकास होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते.
तसेच विविध महाविद्यालयीन स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाते याचाच परिणाम म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धामध्ये उज्वल यश प्राप्त होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थ्यानीचे संस्थेचे अध्यक्ष श्री चांगदेव कातकडे, संस्थेचे सेक्रेटरी श्री प्रसाद कातकडे, विश्वासू विजय कडू, दिपक कोटमे तसेच फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन जैन,उपप्राचार्य सौ.उषा जैन क्रिडा प्रमुख श्री चव्हाण सचिन व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सदर यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *