
कोपरगाव प्रतिनिधी:-
आपल्या जि. प. देवकरवस्ती( टाकळी) शाळेत लायन्स क्लब कोपरगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना 13120/ रुपये किमतीच्या स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच श्री. बाबासाहेब मालकर.(शिर्डी संस्थान )यांचे कडून 1800/ रुपयांच्या तीन खुर्च्या शाळेत प्रदान करण्यात आल्या. प्रसंगी लायन्स क्लब चे अध्यक्ष श्री सुमित भट्टड, सचिव श्री. प्रसाद भास्कर, अक्षय गिरमे संदीप राशिनकर,श्री.मोहन उकिर्डे, श्री शिंदे सर, श्रीराम थोरे साहेब , माजी सभापती सुनील भाऊ देवकर, सरपंच श्री. संदीप देवकर smc अध्यक्ष श्री. सचिन देवकर, उपाध्यक्ष सचिन मालकर उपस्थित होते. प्रसंगी सभापती सुनील देवकर म्हणाले जिल्हा परिषदेचे शाळेतच मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. लायन्स क्लब ने हाती घेतलेल्या जनसेवेच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय खरात यांनी केले तर श्रीमती उज्ज्वला शेळके यांनी आभार मानले.
