काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे संभाव्य उमेदवार राजेंद्र वाघमारे यांनी  झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस्’ गौरीची भेट घेवुन केले अभिनंदन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
ब्राह्मणगाव या छोट्याशा खेड्यातील गौरी अलका पगारे हिने प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत कठोर परिश्रम घेऊन आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस्’ या रिअ‍ॅलिटी शोच्या २०२३ च्या पर्वाचे विजेतेपद पटकावून ब्राह्मणगाव व कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे  यानिमित्ताने काँग्रेसचे शिर्डी लोकसभा  संभाव्य उमेदवार राजेंद्र वाघमारे यांनी  भेट घेऊन गौरीचे अभिनंदन केले आहे

अभिनंदन करून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी राजेंद्र वाघमारे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस ,अमित लुनिया काँग्रेसचे नेते ,किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष भागवत भवर, काँग्रेसचे नेवासा तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पठारे, चंद्रकांत बागुल कोपरगाव तालुका अनुसूचित जाती विभाग तालुका अध्यक्ष, विलास जाधव त्याचबरोबर नितीन शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव ,सोपान धनेक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष कोपरगाव, मनोहर कोकाटे काँग्रेस ,विजयराव जाधव जिल्हा उपाध्यक्ष किसान काँग्रेस, ज्ञानेश्वर भगत काँग्रेस सेवा दल तालुका अध्यक्ष कोपरगाव, छबुराव शिंगाडे काँग्रेस परिवहन विभाग तालुका अध्यक्ष कोपरगाव, यांनी दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी गौरी पगारे हिची भेट घेऊन तिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *