
कोपरगाव प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्थेच्या,श्री.सदगुरु गंगागीर महाराज सायन्स,गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव मध्ये दि.६डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर,वर्शिप अर्थ फौंडेशन(अहमदनगर शाखा) आणि महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत १८ वर्ष पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोबाईल च्या माध्यमातून मतदार नोंदणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सानप आर.आर.यांनी भूषविले, यावेळी मतदान करणे हा लोकशाहीतील अत्यंत पवित्र अधिकार असून सर्वांनी तो बजावला पाहिजे असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.रणधीर एस.बी.,वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.भागवत ए.बी. उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सुपेकर व्ही.पी.यांनी केले तर बी.बी.ए.विभागप्रमुख प्रा.साळवे एन.बी.यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.डीबरे रोहिणी यांनी मानले.सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला.
