श्री भवानी देवी मंदिर ट्रस्ट, श्रीमंत प्रगत शिवाजी रोड कोपरगाव, अंबिका तरुण मंडळ, सुर्यतेज संस्थेच्या वतीने “महिषासुरमर्दिनी स्रोतम्” चे पठण आणि महाप्रसादाचे वाटप…

Uncategorized

ज्ञान असाल तर प्रसन्न रहाल:- प्रसिद्ध कथाकार गणपत महाराज लोहाटे….

श्री भवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त सामुदायिक आरती, महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्, जोगवा, देवीची गोंधळ गीतांसह शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वितरणाचा कार्यक्रम…

डाॅ.सी.एम.मेहता कन्या विद्यालय आणि न. पा. शिक्षण मंडळ शाळा क्र. ६ च्या विद्यार्थ्यांनींचा सहभाग…

श्री भवानी देवी मंदिर ट्रस्ट,श्रीमंत प्रगत शिवाजी रोड कोपरगाव, अंबिका तरुण मंडळ,सूर्यतेज संस्थेच्या वतीने आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:-
शालेय जीवनापासून संस्कार महत्त्व असून प्रत्येक सण, उत्सवाचे माध्यमातून होणाऱ्या संस्काराला विशेष महत्त्व आहे.संस्कारातून होणारे ज्ञान असेल तर प्रसन्न रहाल. असे उद्गार प्रसिद्ध कथाकार गणपत महाराज लोहाटे यांनी काढले.
कोपरगाव शहरातील जुने गावठाण भागातील कुंभारवाड्यालगत शेकडो वर्षांची परंपरा असलेले श्री भवानी देवी मंदिर आहे. या मंदिरात देवीच्या साडेतीन शक्तिपीठांची एकत्र स्थापना करण्यात आली आहे.यात रेणुकामाता (माहुरगड), तुळजाभवानी (तुळजापुर), महालक्ष्मी (कोल्हापूर) सप्तशृंगी (वणी) या देवींच्या स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचे प्रांगणात डाॅ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या १०१ विद्यार्थ्यांनींनी सहभागी होवून संस्कृत भाषेतील “महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्” चे शब्द आणि स्वरांचा सुरेख संगम साधत सामुदायिक वाचन केले.


या प्रसंगी प्रसिद्ध कथाकार ह.भ.प.गणपत महाराज लोहाटे,डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या प्राचार्य प्रमोदिनी शेलार,न.पा.शिक्षण मंडळ शाळा क्र. ६ च्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना निंबाळकर, श्री भवानी देवी मंदिराचे व्यवस्थापक सौ.ऊषा भालचंद्र गायकवाड,सौ.वैशाली गायकवाड,अध्यक्ष विनायक गायकवाड,डाॅ.मयुर जोर्वेकर,श्रीमंत प्रगत चे संस्थापक संतोष साबळे, जनार्दन शिंदे, साई आर्ट्सचे संचालक सतिष गुजराथी,सोमेश्वर महादेव देवस्थानच्या सौ.संगिताताई पाटील,सौ.सुचित्राताई नलगे,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,अॅड.सौ.श्रध्दा जवाद,सौ.ऐश्वर्या वाघमारे,संस्कृत शिक्षिका सौ. शोभा दिघे,अंबिका तरुण मंडळाचे शुभम गायकवाड,सुदाम गायकवाड,गोपिनाथ गायकवाड,शिक्षिका सौ. सुनिता वाबळे,सौ.विणा चौधरी,सौ.सुनिता ईगळे,सौ.सविता साळुंके,सौ.आरती कोरडकर, अरुण पगारे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री भवानी देवी मंदिर ट्रस्ट,कोपरगाव, श्रीमंत प्रगत नवरात्रोत्सव मंडळ,अंबिका तरुण मंडळाचे वतीने डॉ.सी.एम मेहता कन्या विद्यालयाच्या १०१ विद्यार्थ्यांनींचे सामुदायिक “महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्”चे वाचन नवरात्रोत्सवाच्या सप्तमी निमित्त आयोजन करण्यात आले होते. संस्कृत ही प्राचीन भाषा असून अनेक ग्रंथ दूर्मिळ दस्त याच भाषेत आढळतात.संस्कृत भाषेचे ज्ञान शालेय विद्यार्थ्यांना अवगत रहावे. या भाषेची अभिवृद्धी व्हावी.म्हणून संस्कृत भाषेतील विविध स्तोत्रे,श्लोकांचे निरंतर वाचन सुरु असते.नियमित वाचनाने उच्चार सुधारणा होण्यास मदत होते.


या प्रसंगी न. पा. शिक्षण मंडळाच्या शिक्षकांनी देवीचे गीत सादर केले. देवस्थाचे वतीने गायकवाड परिवाराकडून कुसुम गायकवाड यांनी कुमारिका पुजन केले.यानंतर कै. सौ. सुमतीताई घोडके स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांचे संकल्पनेतून १५१ आवळा रोपांचे वितरण शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले. लोककलावंत विशाल चव्हाण यांचे संबळ वाद्यावर देवीची गीते सादर केली.उपस्थितांना स्नेहवस्र, श्रीफळ आणि सिताफळ रोप देवून सन्मान करण्यात आला. फराळ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
शेकडो वर्षांपासून अंबिका देवी मंदिरात भवानी देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात.
या उपक्रमास कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्रीमती शांताबाई गायकवाड,सौ.तृप्ती गायकवाड,सौ मंगल गायकवाड, निवृत्ती गायकवाड,देविदास गायकवाड, बंडोपंत गायकवाड, श्रीमंत प्रगतचे सौ.मनिषा साबळे,सौ.मनिषा जनार्दन शिंदे,सौ.ज्ञानेश्वरी सोनवणे,सौ.सोनाली कहार,सौ.अनुराधा कानडे,रितीक वर्मा, सिध्दार्थ शेलार,सौ. शितल आमले,सोमनाथ शिंदे,अनंत रुकारे,संजय ठाकूर,अभिषेक गायकवाड,गोपी खैरे,समर्थ गायकवाड यांचे सह भाविक,अंबिका तरुण मंडळ आणि श्रीमंत प्रगतचे सदस्य उपस्थित होते.अंबिका मंदिरात यापुढेही असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक गायकवाड यांनी केले आहे.
“महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्” वाचनाने आणि धार्मिक कार्यक्रमाने परिसराचे वातावरण भक्तिमय झाले होते.भाविकांनी विद्यार्थ्यांनींचे कौतुक केले आहे…

जयभवानीजय_अंबिका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *