
कोपरगाव प्रतिनिधी:-
विविध शैक्षणिक संस्थेतील ग्रामीण भागातील हुशार व गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी लायन्स क्लबचे जवळपास पाच लाख रुपये खर्चाचे उपक्रम आज के जे सोमय्या कॉलेजच्या प्राणंगात संपन्न झाला.
नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे लायन्स क्लब या संस्थेमार्फत कोपरगाव परिसरातील शाळा संत तुकाराम माध्यमिक विद्यालय नाटेगाव, डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यामंदिर कोपरगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरगाव ब्रांच, माधवराव जी कचेश्वर आढाव माध्यमिक विद्यालय कोपरगाव, के बी रोहोमारे ज्युनिअर कॉलेज कोपरगाव जिल्हा परिषद शाळा बोरावके वस्ती, जिल्हा परिषद शाळा भास्कर वस्ती अशा शाळांना मदत करण्यात आली. सदर प्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगर चे अध्यक्ष लायन श्रद्धा शहा यांनी सगळ्यांचे स्वागत केले, सदर प्रसंगी बोलताना लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष सुमित भट्टड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःतील वेगळेपण ओळखा आणि यशस्वी व्हा आणि त्यानंतर समाजातील इतर गरजू विद्यार्थ्यांना आपणही मदत करून सामाजिक बांधिलकी जपायची आहे असा संदेश दिला. या उपक्रमामध्ये पुणे इथून आलेले लायन सीडी सेट यांनी मोठी मदत केलेली आहे. सदर प्रसंगी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
या कार्यक्रमात कोपरगाव क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड, सचिव प्रसाद भास्कर, खजिनदार अभिनंदन शिंगी , तुलसीदासजी खुबानी, आर सि सुधीर डागा, राम थोरे, अक्षय गिरमे, संदीप राशिनकर, सत्यम मुंदडा, सुरेश शिंदे, डॉ. तुषार गलांडे, डॉ किशोर नागरे, कैलास नागरे, श्याम जंगम, अक्षय बोरा, भीमजी पटेल आणि पुणे सहकार नगरचे अध्यक्ष श्रद्धा शहा, सरिता ताई सोनावळे , आनंद आंबेकर, सुनील चेकर, शैला सेठ, ललिता शिंदे, किशोरी कचरे, कविता चेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन प्रसाद भास्कर यांनी केले. के जे सोमय्या महाविद्यालयाचे सर्वेसर्वा श्री अशोकरावजी रोहमारे आणि प्राचार्य डॉ. बी एस यादव सर यांची मोठी मदत झाली.
