के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश
कोपरगाव : स्थानिक के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कु. तनिष्क सुनील कटारनवरे यांने शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे दि.१४ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत त्याने हे यश संपादन केले आहे. आता त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तनिष्क ने कुस्ती स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने को.ता. एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे, क्रीडा शिक्षक डॉ. सुनील कुटे, प्रा. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते तनिष्कचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *