सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची प्रेरणा व संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे याही वर्षी कारखाना कार्यस्थळावरील आराध्यदैवत हनुमान मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याची सांगता संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आळंदी परिसरातील धारणगाव येथील हभप गुरूदेव महाराज चव्हाण यांच्या काल्याच्या किर्तनाने शुक्रवारी करण्यात आली.
राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ करण्यांत आला होता. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे व तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी सभासद, शेतक-याबरोबरच पंचक्रोशीतील उपेक्षीत घटकांसह साखर कामगारांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे व त्यांच्या सहका-यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हभप गुरूदेव महाराज चव्हाण व हभप जालिंदर महाराज शिंदे, हभप संगिताताई चव्हाण यांचा संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.
श्री. बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, अध्यात्माचा वारसा कोपरगांव तालुक्याला लाभला आहे. गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची परंपरा नारायणगिरी महाराजांनी अव्यवहतपणे जपली. त्यांचा हा वारसा महंत रामगिरी महाराज नेटाने पुढे चालवत आहे. गेल्या दोन महिन्यापासून वरूणराजाची प्रतिक्षा सर्वांना होती मात्र परमेश्वराची आराधना, पर्जन्ययाग व शिंगणापुर पंचक्रोशीतील ज्ञानेश्वरी पारायणातील सर्वांचा सहभाग यामुळे मतदारसंघावर गुरूवारपासुन निसर्गराजाने चांगलीच कृपा केली आहे. त्याच्या आगमनाने शेतक-यांचे जीवनमान उंचावणार आहे. ईश्वराने समानतेचा संदेश देवुन जातीभेदाच्या भिंतीचे उच्चाटन करण्यासाठी हरीभक्तीच्या माध्यमांतून जे कार्य केले ते अलौकीक आहे.
तालुका साखर कामगार सभेचे कामगार नेते मनोहर शिंदे, हभप माउली महाराज ठोंबरे, प्रशांत रेपाळे, धीरज कु—हे, दत्ता महाराज जेजुरकर, आत्माराज नवले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक, यांच्यासह शेतकरी सभासद, संजीवनी उद्योग समुहातील सर्व संस्थाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, साखर कामगार, आदिसह भाविकभक्त, महिला मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.

फोटोओळी-कोपरगांव-
सालाबादप्रमाणे याही वर्षी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर पारायण सोहळयाची सांगता संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व हभप गुरूदेव महाराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली, उद्योग समुहाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यांत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *