काकडी परिसरातील विविध समस्या सुटल्या पाहिजे:- कानिफनाथ गुंजाळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
काकडी (विमानतळ ) मल्हारवाडी, डांगेवाडी व गुंजाळवस्ती गावातील तसेच, वाड्या वस्त्यावरील पाण्याची, विजेची व रस्त्यांची अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली असून त्या संदर्भातील समस्या(BDO)
गटविकास अधिकारी, सचिनजी सूर्यवंशी साहेब यांच्याकडे मांडल्या आहे.सदर गावामध्ये,, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, नुसत्या टर्मिनल बिल्डिंग साठी साडेपाचशे कोटी रुपये मंजूर होतात.परंतु आमच्या हक्काचा थकीत असलेला ग्रामपंचायतचा साडेसहा कोटी रुपयांचा कर मात्र आम्हाला मिळत नाही.तसेच ग्रुप ग्रामपंचायत असल्याने व ग्रामपंचायत मध्ये निधी पुरेसा नसल्याने विकास कामे सरपंचाने करायची कशी.? हा एक गंभीर प्रश्न आज आमच्यापुढे पडलेला आहे.विमानतळ महाराष्ट्रातलं तीन नंबरचं गतिमान विमानतळ आहे.त्याचबरोबर परिसरातील कोणतीही विकासाची मोठी बातमी असो.. त्यात विमानतळाचे नाव घेतल्याशिवाय बातमीलाही वेटेज वाढत नाही.
पण ज्या मायबाप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी व गावाने कवडीमोल भावात दीड हजार एकर जमीन विमानतळाला दिली त्यांचे मात्र वाटोळे झाले आहे, त्यांना शेतीही राहिली नाही व मुलांना नोकरीही मिळाली नाही.


आज रोजी प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांची संख्या गावात वाढत चालली आहे, आम्ही सरपंच या नात्याने बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संदर्भात नुसता जाब विचारायला विमानतळावर मागे काही दिवसांपूर्वी गेलो असता, त्यांनी लगेच माझ्या घरी पोलीस गाडी पाठवली व 353 सारखे गुन्हे दाखल करायला लागले.परंतु माय माऊली, भाजपा प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांच्या मुळे गुन्हा होता होता टळला.विमानतळ करते वेळी शेतकऱ्यांना सांगितलं गेलं,, विमानतळातून तुम्हाला लाईट मिळेल आज पर्यंत एकही शेतकऱ्याला त्यांच्याकडून लाईट नाही.वाड्या वस्त्यांवर जायला रस्ते नाही, पाण्याची निर्माण झालेली गंभीर परिस्थिती.आज विमानतळा कडील निधी न भेटल्याने गावातील विकास कामे मोठ्या प्रमाणात रखडले आहे.
हे सर्व चुकीचे घडत आहे.


काकडी गावाची दूरदशा कोणाची नजर लागली म्हणून नाही,तर कोणाचीच नजर पडली नाही म्हणून झाली.जर अशीच परिस्थिती काही वर्ष चालू राहिली तर नक्कीच या काकडी गावाची परिस्थिती मुळशी पॅटर्न च्या पिक्चर सारखी झाल्याशिवाय राहणार नाही.मग त्यावेळी बेरोजगार तरुण नोकरी मागायला विमानतळाकडे जाणार नाही,, उलट विमानतळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाच गावातील चौकात जाब विचारला जाईल.
हे सर्व होण्याआधी सद्गुरू साईबाबा चरणी एवढीच प्रार्थना राहील की बाबा.. साईभक्तांसाठी विमानतळ व्हावे म्हणून ज्या गावाने हजारो एकर जमीन कवडीमोल भावात दिली.


त्या गावातील बेरोजगार तरुणांना विमानतळा मध्ये कामाला घ्यावे.
व ग्रामपंचायतचा कर तात्काळ मिळावा यासाठी राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्या. असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात कानिफ सोपानराव गुंजाळ.अध्यक्षश्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी वाहतूक सहकारी संस्था. यांनी म्हणाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *