

कोपरगाव प्रतिनिधी:- समृद्धी महामार्गाच्या निर्मिती कामामुळे खराब झालेल्या इजीमा २१५ वारी धोत्रे रस्त्याचे डांबरीकरण काम तातडीने करणे कामी ३१ऑगष्ट रोजी वारी ग्रामपंचायत समोर उपोषण सुरु केले होते
परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी समृद्धी महामार्गाचे प्रकल्प अधिकारी मोपलवार व सातपुते यांच्याशी संपर्क साधुन चर्चा केली तसेच स्थानिक अधिकारी शेख, सुमित वैद्य यांनी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे मान्य केल्याने तसेच नाशिक येथे डांबरीकरण संदर्भात लवकरच उपोषणकर्ते व अधिकारी अशी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे मान्य केले. यावेळी नायब तहसीलदार सातपुते मॅडम, मंडळ अधिकारी कोल्हे, तलाठी कदम,वारीचे प्रशासक साबळे,ग्रामविकास अधिकारी वारकर यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण कर्त्यांनी उपोषण सोडल्याचे जाहीर केले
उपोषणकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य शेतकरी सेनेचे गोरख टेके,माजी सभापती मच्छिंद्र टेके,माजी सरपंच रावसाहेब टेके माजी प स सदस्य अशोकराव कानडे, तान्हाजी थोरमिशे, बाबासाहेब थोरमिशे,भाऊसाहेब टेके, तुषार वरकड, संजय थोरात, चांगदेव भुजाडे, अण्णा टेके,सत्यम टेके,दत्तु ठोंबरे,शांताराम जाधव,स्वप्निल टेके,बाळासाहेब ठोंबरे यांचे सह जेष्ठ नेते नामदेवराव जाधव पत्रकार रोहित टेके अँड शरद जोशी, बद्रीनाथ जाधव, विशाल गोर्डे, गिरीधर पवार,मधुकर टेके,सरपंच सतिश कानडे यावेळी उपस्थित होते.
उपोषणाने प्रश्न न सुटल्यास समृद्धी महामार्गावर गाई सोडून आंदोलन करण्याचा इशारा उपोषण कर्त्यांनी दिला होता. महामार्गाचे काम सुरू असताना तब्बल अडीच वर्ष इजिमा २१५ वारी ते धोत्रे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होऊन रस्त्याची दुरावस्था झाली आहे परिणामी विद्यार्थी, दूध उत्पादक शेतकरी वृध्द व महिलांच्या आरोग्याबाबत असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले होते या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करून समृद्धी प्रशासनाने सदरचा प्रश्न सोडविला नाही. तात्पुरते खडीकरण केले ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाल्याने शेतकरी नागरिक त्रस्त होते. अखेर सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून ग्रामसभेच्या दिवशी वारी ग्रामपंचायत समोर संबंधित शेतकरी आमरण उपोषणाला बसले होते परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मोपलवार, सातपुते व कार्यकारी अभियंता पवार यांच्या समवेत चर्चा केली प्रश्न न सुटल्यास समृद्धी महामार्गावर गाई सोडून शेतकरी आंदोलन करणार असल्याचे लक्षात आणून देताच या उपोषणाची तातडीने दखल घेऊन स्थानिक अधिकाऱ्यांना उपोषण स्थळी पाठवून त्यांचे मार्फत रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे मान्य केल्याने अधिकारी शेख व जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांच्या हातून लिंबू पाणी घेऊन सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.
